सुरेंद्र इखारे, वणी – तालुक्यात झालेल्या महापूर व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरवडून निघाल्यामुळे 2 हेक्टर वरील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी वणी SDO यांचे मार्फत मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना देण्यात आले होते . परंतु दिलेल्या निवेदनाची दखल तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयाने घेतल्याने पुढील कार्यवाहीसाठी मदत व पुनर्वसन याना पाठविण्यात आली आहे .अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून कळविण्यात आले होते परंतु शासनाने तात्काळ निर्णय घेतल्याने . आज रोजी 31 ऑक्टोबर 2022 ला शासन निर्णय काढून शेतकऱ्यांना दिलासा दिला असे विजय पिदूरकर यांनी सांगितले आहे .
यावर्षीच्या खरीप हंगामात महापूर व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे पुढील हंगाम करण्यासाठी शासनाने तात्काळ निर्णय घेऊन शासन निर्णय काढून शेतकऱ्यांना दिलासा दिला. यामध्ये शेतजमिनिवरील गाळ, डोंगराळ शेतजमिनिवरील मातीचा ढिगारा, मत्स्यशेती दुरुस्ती करणे यासाठी शासनाने प्रत्येक बाबीकरिता 12 हजार 200 रुपये प्रति हेक्टर शेतजमीन नुकसानीची मदत देण्यात येणार आहे. तसेच दरड कोसळणे, जमीन खरडणे व नदीपात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी महसूल अभिलेखानुसार शेतजमिनीचे मालक असलेल्या अल्प व अत्यल्पभूदारक शेतकऱ्यांना 37 हजार 500 रुपये प्रति हेक्टर या दराने मदत अनुज्ञय राहील असा शासनाने निर्णय घेतला आहे त्यानुसार मदत देण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांत आनंद व्यक्त होत असून विजय पिदूरकर यांच्या सततच्या पाठ पुराव्यामुळे फार मोठी उपलब्धी मिळाली आहे असे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांत बोलल्या जात आहे .
तसेच 2 हेक्टर च्या वरील शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून जाणे व भर पडणे 4 हेक्टर मर्यादेपर्यंत अविलंब शासन निर्णय काढून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी सुध्दा निवेदनातून विजय पिदूरकर यांनी केली आहे त्यामुळे आता शासन काय कार्यवाही करते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी दिली.