• गावासाठी सरपंचाने घेतली ठाम भूमिका…”झुकेंगा नहीं साला…….”
अजय कंडेवार,झरी :- तालुक्यातील बहुसंख्येने मोठी असलेल्या मुकूटबन येथे आज झालेल्या ग्रामसभेत जनतेकडून चौदा वित्त,पंधरा वित्त आयोग,सामान्य फंड मधुन आराखडयानुसार गावातील विविध विकास कामांना मंजूर करून विकास कामाला वेग दिला आहे.
मागच्या काळात मुकुटबन गावात विकास कामे का होत नव्हते याचा खुलासा सरपंच मीना आरमूरवार यांनी ग्रामसभेत केले.विकास कामात येणाऱ्या अडचणी जनतेसमोर मांडल्या. काही हितचिंतक यांनी गावाच्या विकास कामाव्यतिरिक्त प्रश्न उपस्थित करून सभागृहात शांतता भंग करण्याचा केविलवाणा प्रयत्न केले .परंतु उपस्थित पोलीस कर्मचारी कडून त्यांना सूचना देऊन सभागृह शांत करण्यात आले. अश्या विरोधकांना थारा न देता गावाच्या विकासाकरिता कोणते चांगले निर्णय घेता येईल याकडे सरपंच यांनी लक्ष केंद्रित केले.विकास काम करताना,बिल काढताना कोणत्या अडचणी येत होत्या, याचे खुलासेही जनतेसमोर आमसभेत मांडल्या.
बहुचर्चित असलेल्या आमसभेत महिला आरक्षण चा मुद्दा काढून संविधानाने बहाल केलेल्या राज्यघटनाचा अपमान केला असे विचार सरपंच यांनी मांडले .या ग्रामसभेत पंधरा वित्त आराखडा मंजुरी,संविधान भवन आदर्श दलित वस्ती प्रत्येक वार्डात समान काम,कब्रस्थान पाणीपुरवठा,रोजगार मेळावा प्रत्येक वार्डतुन सिमेंट पाईप नाली पंधरा वित्त मधील सर्व कामे असे विविध विकास विषय कामे मंजूर करून घेण्यात आले. घरकुल चे प्रपत्र ड चे वाचन करण्यात आले .गावातील विकास कामे करण्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामस्थ यांची सहकार्यची गरज आहे .
तेव्हाच गावाचा विकास होऊ शकते असे प्रतिपादन सरपंच यांनी केली व 11 ते 4 वाजेपर्यंत चालत असलेली ग्रामसभेची सांगता करण्यात आली बहुचर्चेत असलेली ग्रामसभा जनतेचे सहकार्यने शांततेत पार पडले यासाठी सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य ,ग्रामस्थ सचिव कर्मचारी पोलीस कर्मचारी सर्वांचे सहकार्य लाभले