•ट्रक चालक फरार, तरूण जखमी.
अजय कंडेवार,वणी:- शिरपूर मार्गावर मालवाहू वाहन व भरधाव ट्रकची जबर धडक झाली.यात मालवाहनाचा चालक गंभीर जखमी झाला. रविवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास शिरपूर मार्गावर हा अपघात झाला. विनोद मोहाळे वय अंदाजे 35 वर्ष रा.(मंदर) येथील रहिवासी आहे.
रविवारी दिनांक 24 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास विनोद हा मंदर येथून मालवाहू वाहनात नेहमीप्रमाणे चॉकलेट, बिस्कीट चा थोक माल घेऊन खेळोपाळी जाऊन चिल्लर दुकानांना माल विकायचा. तो दुपारी 1 वाजताचा दरम्यान कामे आटपून शिरपूर मार्गावरून मंदर या गावाकडे मालवाहक क्र.MH29BD -2263 या वाहनाने परत निघाला असता रस्त्यातच वणीकडील दिशेने शिरपूरकडे येणाऱ्या एका भरधाव ट्रक क्र.RJ -23-TR-3898 या हायवा ट्रकने समारोसमोर जबर धडक दिली असता, मालवाहू वाहनाचा जागीच चेंदामेंदा झाला. त्यात मालवाहू तरूण विनोद हा गंभीर जखमी झाला व अपघात होताच ट्रकचालक ट्रक सोडून पसार झाला. कारण प्राथमिक माहिती अशीही मिळाली की, ट्रकचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान रस्त्यावरून जाणा-या काही वाहनचालकांना अपघात झाल्याचे कळताच त्यांनी वाहन थांबवले. अपघाताची माहिती गावक-यांना दिली. गावकरी घटनास्थळी दाखल झाले. जखमी विनोदला तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले.