•राजस्थानी नृत्य प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले.
अजय कंडेवार,वणी:- शाळेतील स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी कलागुण सादर करण्यासाठी पर्वणीच असते. सांस्कृतिक कार्यक्रमतून विद्यार्थ्यांना कलाविष्कार सादर करण्यास एक चांगले व्यासपीठ उपलब्ध होते. त्याव्दारे विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुणांना वाव मिळतो तसेच शाळेची गुणवत्ता उत्तम आहे.या शाळेतून आदर्श नागरिक घडतील तसेच कोणत्याही समस्येची न भीती बाळगता आपण समोर गेलो पाहिजे,असे प्रतिपादन आमदार बोदकुरवार यांनी मार्कंडेय पोदार लर्न स्कुल, मंदर येथे ता.२७ जाने २०२४ शनिवार रोजी “लक्ष्य ” वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी केले. Markandey Podar Learn School “Lakshya” Annual Reunion.
या स्नेहसंमेलनात गणेशवंदना, भारतीय संस्कृती, सण-उत्सव,लोककला, शेतकरी नृत्य, सिनेगीतांवरील नृत्य, सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. लहान मुलांची अभिनयक्षमता पाहून पालकांनीदेखील उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून दाद दिली. कार्यक्रमाची सुरुवातीलाच दिपप्रज्वलन व प्रतिमेला हाराअर्पण करून करण्यात आले.तीनशे सहून अधिक बालचिमुकल्यांनी हिंदी, मराठी, लावणी, नाटक, पोवाडा, सांस्कृतिक गीते विविध वेशभूषांमध्ये सादर केली. मुलांनी गायन, कोळी, शेतकरी, बॉलिवूड, गुजराती व मराठी नृत्यातून विविध कलाविष्कार सादर केले.स्नेहसंम्मेलनातील नृत्यांमध्ये राजस्थानी नृत्य प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्र ठरले तर ३०० विद्यार्थ्यांनी स्नेहसंम्मेलनात सहभाग घेतला.
या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक व अध्यक्ष वणी विधानसभा आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, प्रमुख पाहुणे म्हणुन उपविभागीय दंडाधिकारी नितीन हिंगोले, मार्कडेय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश सुंकुरवार,उपाध्यक्ष धनंजय मुक्तेवार, सचिव राहुल सुंकुरवार,ललिता संजिवरेड्डी बोदकुरवार,वर्षा मुक्तेवार, कुणाल सुंकुरवार शाळेचे मुख्याध्यापक आमिन नुरानी ,कविता सुंकुरवार ,प्राची सुंकुरवार व पुनम सुंकुरवार हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन गुडीया पाठक व निशा रियाज यांनी केले तर आभारप्रदर्शन आमिन नुरानी यांनी मानले.या कार्यक्रम यशस्वितेकरीता समस्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.