•जनहित कल्याण महिला संघटना , क्रांतीयुवा संघटना व ग्रामिण पत्रकार संघटनेचे आयोजन
नागेश रायपुरे, मारेगाव:- ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त येथील महामार्गा लगत सा.बा. विभागाच्या क्वॉटरच्या भव्य प्रांगणात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारीत समाजात क्रांतीची मशाल पेटवणारे “क्रांतिसूर्य ज्योती सावित्री” या महानाट्याचे आयोजन जनहित कल्याण महिला संघटना , क्रांतीयुवा संघटना व ग्रामिण पत्रकार संघ मारेगावच्या संयुक्त विधमाने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक वरोरा भद्रावती विधान सभेच्या आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर या आहेत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.डॉ. विभाताई पोटदुखे, तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. अरुणाताई खंडाळकर, माजी महिला व . बाल कल्यान सभापती, किरणताई देरकर , अध्यक्षा एकविरा पतसंस्था मारेगांव, शितलताई पोटे माजी सभापती मारेगांव, अंजुम नबी शेख , नगरसेविका, डिमणताई टोंगे, सामाजीक कार्यकर्त्या, रेखाताई मडावी माजी नगराध्यक्ष , इंदुताई किन्हेकर , माजी नगराध्यक्ष, विशेष अतिथी डॉ अर्चना देठे तालुका आरोग्य अधिकारी, माया चाटसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वणी, संध्या पोटे, संचालिका विद्यानिकेतन स्कुल , सुषमा काळे, मुख्याध्यापिका कन्या विधालय मारेगाव या उपस्थित राहणार आहे.
परीसरातील तमाम नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा, क्रांती युवा संघटनेचे राकेश खुराणा तसेच ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष देवेंद्र पोल्हे यांनी केले आहे.