नागेश रायपूरे, मारेगाव:- भिमा कोरेगाव शौर्य दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधुन राष्ट्रीय प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांच्या संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन ०२ जानेवारी २०२३ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खुल्या पटांगणात करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन फुले- शाहु – आंबेडकर प्रबोधन विचार मंच मारेगाव तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका मारेगाव, वणी, झरी यांच्या संयुक्त विधमाने करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजु भाऊ उंबरकर आहेत. भिमा कोरेगाव शहीद हुतात्म्यांना बलिदानाची शौर्यगाथा समाजमनात कायम तेवत राहावी, त्यांच्या आहुत्याना उजाळा देण्यासाठी
राष्ट्रीय प्रबोधनकार वादळवारा केसेट सागर, विद्रोही व क्रांतिकारक गायक अनिरुद्ध वनकर यांच्या संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे.
वणी विधानसभा क्षेत्रातील तमाम समाज बांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक फुले- शाहु – आंबेडकर प्रबोधन विचार मंच मारेगाव तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मारेगाव च्या वतीने करण्यात आले आहे.