•ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले
नागेश रायपुरे, मारेगाव:- 18 डिसेंबर 2022 रोजी तालुक्यातील 9 ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणुक होवु घातली आहे.यात एकुण नऊ ग्रा.प.च्या थेट सरपंच पदाकरिता 38 तर 9 ग्रा.प.च्या एकूण 67 सदस्य पदाकरिता तब्बल 179 नामनिर्देशन पत्र अखेरच्या दिवशी उमेदवारांनी दाखल केले आहे.
तालुक्यातील वेगाव, हिवरी, नवरगाव, कानडा, शिवणी (धोबे), वनोजादेवी, मार्डी, कोसारा, व गौराळा या नऊ ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी येत्या 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.गावातील राजकीय पुढाऱ्यांना ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे च्या गावगाड्यातील राजकीय पुढाऱ्यांनी आता आपली चांगलीच कमर कसली आहे.
तालुक्यातील 9 सदस्य संख्या असलेल्या ग्रा.प. वेगाव ग्रा.प.साठी थेट सरपंच पदाकरिता 4 तर सदस्य पदाकरिता चक्क 30 तसेच ग्रा.प.मार्डी साठी सरपंच पदाकरिता 6 तर सदस्य पदाकरिता 25 नामनिर्देशन पत्र उमेदवारांनी दाखल केले.तसेच 7 सदस्य संख्या असलेल्या ग्रा.प.हिवरी- सरपंच पदाकरिता 6 तर सदस्य पदाकरिता 16, ग्रा.प. नवरगाव – सरपंच पदाकरिता 4 तर सदस्या करिता 25, कानडा – सरपंच पदाकरिता 2 तर सदस्यांसाठी 14, शिवणी (धोबे)- सरपंच पदाकरिता 5 तर सद्स्य पदाकरिता 14, वनोजादेवी- सरपंच पदाकरिता 5 तर सदस्यासाठी 24, कोसारा – सरपंच पदाकरिता 2 तर सद्स्य पदाकरिता 17, गौराळा- सरपंच पदाकरिता 4 तर सदस्य पदाकरिता 19 असे नऊ ग्रामपंचायत च्या एकूण 67 सदस्य पदाकरिता 179 तर थेट सरपंच पदाकरिता 38 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे.
या नऊ ही ग्रामपंचायतच्या नामनिर्देशन अर्जाची छाननी 5 डिसेंबरला येथील तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात होणार असून अर्ज मागे व चिन्ह वाटप 7 डिसेंबर रोजी होणार आहे. किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतील व अखेर रिंगणात किती अर्ज कायम राहील हे 7 डिसेंबर रोजी स्पष्ट होईल.
गावखेड्यातील राजकीय वातावरण तापले:-
“निवडणुकी मुळे या नऊ ही गावातील राजकिय वातावरण आता चांगलेच तापले असुन सरपंच पदाची थेट जनतेतून निवड होत असल्याने गावचा “सरपंच” आपलाच विजयी व्हावा यासाठी गावातील राजकीय पुढाऱ्यांनी चांगलीच कमर कसली आहे.”