•सरपंच पदाचे अनेकांचे स्वप्नं भंगले
•विविध पक्षाचे ग्रामपंचायतवर दावे
नागेश रायपुरे, मारेगाव:- नुकतेच 18 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या मारेगाव तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा निकाल 19 सप्टेंबर रोजी येथील तहसील कार्यालयात घोषित करण्यात आला.
तालुक्यातील ११ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूक काल 18 सप्टेंबर रोजी तालुक्यात उत्साहात पार पडली. सरपंच थेट जनतेतून निवडीने गावकऱ्यात उत्साहाचे वातावरण दिसून आले.
यात गट ग्रामपंचायत कान्हाळगाव च्या सरपंच पदी संजय श्रावण येरमे हे विजयी झाले तर मच्छिंद्रा ग्रामपंचायत च्या सरपंच पदी प्रशांत सुरेश सोयाम, वरुड ग्रा.प.वर सौ. निर्मला शंकर बोंदरे ,डोलडोंगरावर ग्रा.प.वर शितल येरमे, अर्जुनी ग्रा.प.वर वंदना पुरुषोत्तम आत्राम,सगणापूर ग्रा. प.वर दादाराव टेकाम, तसेच गोधनी ग्रा.प.वर मंदा मंडाळी, जळका ग्रा.प.वर ज्योत्स्ना कुमरे,वाघदरा ग्राम.प.दादाराव ठोबंरे ,खंडणी ग्रा.प.दयानंद कुळमेथे,तर ग्राम पंचायत सराठीच्या सरपंच पदी तुळशीराम कुमरे हे विजय झाले.
झालेल्या चुरशीच्या लढतीत दिवसा ढवळ्या गावातील सरपंच होण्याचे स्वप्नं बघणाऱ्या अनेक हवसे गवस्यांचे स्वप्नंच भंगल्या गेले आहे.निवडुन आलेल्या पॅनलवर हे आमच्याच पक्षाचे असल्याचे दावे प्रतिदावे विविध पक्षा कडुन करण्यात येत आहे.यावेळी तहसीलदार दीपक पुंडे यांचे मार्गदर्शनात पंचायत समितीचे संजय वानखडे,पी.एस. जाधव, तसेच महसूल चे मंडळ अधिकारी जाधव यांनी या ग्रा.प.निवडणुकीचे काम पाहले