नागेश रायपूरे, मारेगाव:- नगरपंचायत चे अधिकारी कर्मचारी सह नगरसेवक विकासात्मक कामे करत असुन मारेगाव शहराच्या विकास कामासाठी मी कुठलाही निधी कमी पडु देणार नाही असे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी काल शहरात पार पडलेल्या विकास कामाच्या भूमीपूजन सोहळ्या दरम्यान उपस्थित नागरिकांना ग्वाही दिली.
खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रयत्नाने जिल्हा वार्षिक योजना नगरोथान अंतर्गत येथील प्रभाग क्र.11 मध्ये शेख नब्बू कुरेशी व नागेश रायपूरे ते रेनुदास काळे यांचे घरापर्यंत सी.सी. रोड व भूमिगत नाली चे विकास कामाला निधी मंजूर झाला.तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभाग क्र.12 मध्ये सी.सी.रोड.तसेच प्रभाग क्र.13 मध्ये मध्ये सी. सी.रोड व गटारे, तसेच प्रभाग क्र.16 मध्ये सी.सी.रोड या चार प्रभागातील विकासकामांचे भूमीपूजन सोहळा काल 22 सप्टेंबर रोजी शहरात मोठ्या थाटात पार पडला.
यावेळी खासदार बाळूभाऊ धानोरकर हे भूमीपूजनाचे उदघाटक असतांना या चारही प्रभागातील भूमीपूजन प्रभागातील जेष्ठ नागरिकांसह,भन्तेजी, अपंग व्यक्ती,माजी सैनिक समाजसेवक यांना प्राधान्य देत यांचे हस्ते भूमीपूजन करण्यात आल्याने त्यांच्या या निर्णयाचे प्रभागातील नागरीकांनी स्वागत केले.
यावेळी खासदार बाळूभाऊ धानोरकर, माजी आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वामनराव कासावार,मुख्याधिकारी अभिजित वायकोस,नगराध्यक्ष डॉ.मनिष मस्की,माजी जि. सदस्य.अरूनाताई खंडाळकर,अभियंता निखिल चव्हाण,माजी सभापती शितल पोटे,माजी उप सभापती गजानन खापणे,तालुका अध्यक्ष मारोती गौरकार,कृ. उ.बा. स.उपसभापती वसंतराव आसुटकर,अध्यक्ष वि.वि.का.मारेगाव चे गजानन किन्हेकर,जिल्हा सरचिटणीस शरीफ अहेमद, महिला तालुका अध्यक्ष शकुंतला ताई वैध, शहर अध्यक्ष प्रतिभा कळसकर,नगरसेवक नंदेश्वर आसुटकर,हेमंत नरांजें,शंकर मडावी,आकाश बदकी,सुनीता किन्हेकर, अनिता परचाके,अंजुम नब्बी शेख,छाया किनाके,रवी पोटे,अंकुश माफुर,रवींद्र धानोरकर,धनंजय आसुटकर,प्रफुल क्षीरसागर आदी प्रभागातील प्रतिष्ठित नागरिका सह नगरपंचायत चे कर्मचारी उपस्थित होते.