•राजेश पुरी वणीत “सेकंडअधिकारी ” म्हणून काम पाहणार…..
माणिक कांबळे /मारेगाव :- यवतमाळ जिल्हा पोलीस अस्थापना मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मारेगावचे ठाणेदार राजेश पुरी यांची वणी येथे बदली करण्यात आली असून यवतमाळ शहरचे ठाणेदार जनार्दन खंडेराव यांची मारेगाव पोलीस स्टेशनला बदली करण्यात आल्यामुळे खंडेराव हे मारेगावचे नवे ठाणेदार म्हणून काम पाहणार आहेत..In Maregavche New Thanedar Janardan Khanderao. Rajesh Puri as “Second Officer” in Wani..
महाराष्ट्र पोलीस कायदा 1951मधील कलम 22(न ) नुसार यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्याच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच बदली झालेल्या रिक्त जागेवर नव्या अधिकाऱ्याच्या नेमणूका करण्यात आल्या आहे.
नेमणूका झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याच्या नेमणूका झालेल्या ठिकाणी हजर होऊन अनुपालन अहवाल जिल्हा पोलीस कार्यालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.तसेच प्रलंबित असलेले गुन्हे, अकस्मात मृत्यू,तपास, अर्ज चौकशी,इत्यादी प्रकारणाची कागदपत्रे केस डायरीसह,संबंधित अधिकाऱ्यांकडे हस्तातरीत करण्याची दक्षता व खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ पवन बनसोड यांच्या स्वाक्षरीने देण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव झालेल्या फेरबदलामुळे जनार्दन खंडेराव हे आता मारेगावचे नवे ठाणेदार म्हणून पुढील कामकाज पाहणार आहेत.