•भव्य चौताली दंडार स्पर्धा व कबड्डीचे खुले सामने व समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम
•जय सेवा उत्सव समितीचे आयोजन, लाखो रुपयांचे बक्षीस
नागेश रायपूरे, मारेगाव:- माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा.हंसराज भैया अहिर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन जय सेवा उत्सव समिती बोटोनी च्या वतीने 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील खुल्या मैदानात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात चौताली दंडार स्पर्धा, भव्य कब्बडी स्पर्धा तसेच समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा समावेश आहे.या कार्यक्रमासाठी ग्रामीण पत्रकार संघटना मारेगाव, गुरुदेव सेवा मंडळ बोटोनी तसेच शंकर लालसरे व मित्र परिवार यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
यात 12 नोव्हेंबर रोजी सायं.8 वाजता भव्य चौताली दंडार स्पर्धा चे आयोजन करण्यात आले असुन या स्पर्धेत अनुक्रमे प्रथम 11,000/-, द्वितीय 7,501/-, तृतीय 5,501/-, तर चतुर्थ 3501/- रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहे.तसेच या वेळी कबड्डी स्पर्ध चा उदघाटनिय सामना खेळवण्यात येणार असुन उर्वरित सामने 13 व 14 नोव्हेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.यात प्रथम 21,000/-, द्वितीय 15,000/-, तृतीय 10,000/- तर चतुर्थ 7,000/- रुपयांची रोख बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते ठेवण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटक पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री मा.हंसराज भैया अहिर हे आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे आहेत.तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा चे प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, क्रां.शा. को.सं. चे जिल्हा अध्यक्ष राहुल आत्राम,जेष्ठ नेते दिनकराव पावडे, माजी जि. प.सदस्य विजय पिदूरकर, तसेच तहसीलदार दीपक पुंडे, ठाणेदार राजेश पुरी,जिल्हा सचिव किशोर बावणे,शंकर लालसरे,ता.अध्यक्ष ज्ञानेश चिकटे, सरपंच सौ.सुनीता जुमनाके, आदी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहे.
तरी परिसरातील तमाम स्पर्धकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जय सेवा उत्सव समितीचे अध्यक्ष दिलीप टेकाम, उपाध्यक्ष सुरेश रामपूरे, सचिव अजय जुनगरी, सहसचिव अनिल मोरे, कोषाध्यक्ष प्रवीण टेकाम, संघटक निलेश टेकाम, संपर्क प्रमुख संदीप टेकाम, क्रीडा प्रमुख बादल टेकाम तसेच नाईक मनोहर मेश्राम, महाजन नामदेव जुनगरी, घाट्या अजाब रामपुरे, कारभारी हुसेन सुरपाम, तारमा अनंता आस्वले तसेच ग्रामीण पत्रकार संघटना मारेगाव, गुरुदेव सेवा मंडळ बोटोनी, भाजपा चे जिल्हा सचिव शंकर लालसरे व मित्र परिवार यांनी केले आहे.