•आंदोलनाचा “नववा दिवस”, चर्चेमधून मार्ग निघेना.
•कार्तिकेय कोल वॉशरी व कोलडेपो धारक “जैसे थे”चा भूमिकेत.
अजय कंडेवार,वणी:- यवतमाळ रोडवरील तालुक्यातील कळमना (खुर्द) या गावकऱ्यांचा एकमात्र रस्त्याचा न्यायीक मागणीकरीता 28 नोव्हे.रोजी गावकरी व ग्रामपंचायतचा शेवटचा टोकाचे पाऊल आंदोलनाचे शस्त्र हाती घेत बेमुदत “रास्ता रोको” आंदोलन छेडले आहे. आंदोलनाला नऊ दिवस पूर्ण होऊनही शुल्लक रस्त्याचा मागणीला शासनाकडून सातत्याने दिशाभूल होत असल्यामुळे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच आता तर कार्तिकेय कोल वॉशरी व कोल डेपोही बंद झालेच पाहिजे ही देखील मागणी गावकऱ्यांनी रेटून धरली आहे.
विशेषतः रस्त्याचा समस्येबाबत कार्यालयात 23 मे 2022ला माहिती देऊनही समस्यांचे निवारण करण्याबाबत अर्जही दिला होता, समस्या मार्गी न लागल्याने गावकऱ्यांनी 30 मे 2023 ला “रस्ता रोको” आंदोलन 4 दिवस केले होते, तरी या आंदोलननंतर जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथील कार्यालयात गावकरी व आमदार बोदकुरवार याबाबत दालनात उपाययोजना म्हणुन सदर रस्त्याचे सिमेंट कॉक्रिटिंग करण्याचे ठरले होते. माञ दीड वर्ष होऊनही या रस्त्याबाबत कोणतेही उपाययोजना करण्यात आले नाही .तरी कळमना (खुर्द) गावाला येण्या जाण्याचा रस्ता नसल्याने गावकरी त्रस्त झाले आहे.
त्याकरिता आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी 7.50 कोटीच्या रस्त्यासाठी खनिज विकासनिधीतून 4 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली. बाकी 3.50 कोटी रुपये कार्तिकेय कोल वाँशरी व कोल डेपोधारकांना देण्यासाठी सांगितले; परंतु, इतके रुपये देण्यासाठी त्यांनी असमर्थता दर्शवली व समोर काही चर्चा न झाल्याने हे आंदोलन सुरूच राहणार आहे अशी माहिती उपोषणकर्त्यानी दिले. आता तर कार्तिकेय कोल वॉशरी व कोल डेपोही बंद झालेच पाहिजे ही देखील मागणी गावकऱ्यांनी रेटून धरली आहे.