Wani:- मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आज (दि.१०) ला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील नविन सरकारचा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा भावी काळात ७१ लाख ७ हजार ५०० रोजगार देण्याचा संकल्प असलेला अर्थसंकल्प असल्याने तो रोजगाराभिमुख अर्थसंकल्प असल्याचे भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी म्हटले आहे.
सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात भौतिक संसाधनांसोबत नागरिकांच्या उन्नतीचा सर्वांगीण विचार करण्यात आलेला आहे. एकूणच राज्याला पुढील पाच वर्षात नविन दिशा देणारा व विकसित महाराष्ट्राकडे नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचे भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी पुढे म्हटले आहे.
राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट, आदी कल्याणकारी भौतिक संसाधन व नागरिकांच्या उन्नतीचा सर्वांगीण विचार करणाऱ्या अनेक योजनांचा समावेश असल्याचे डॉ. अशोक जीवतोडे यांनी म्हटले आहे.