मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या विरोधात आम्ही नाही : डॉ. अशोक जिवतोडे
विदर्भ न्युज डेस्क,वणी:- मराठ्यांचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये, असे ठाम मत ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केले आहे.सध्या राज्यात विशेषतः मराठवाड्यात ओबीसी समाजात मराठा समाजाचा समावेश करून आरक्षण देण्याबाबत चर्चा सुरू आहे.
मात्र निजामशाहीतील रेकॉर्ड तपासून कुणबी निकष पूर्ण करणाऱ्या कुणबी समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध नाही, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्यांना याअगोदर पण ओबीसी म्हणून प्रमाणपत्र मिळतच होते, त्याला आमचा विरोध नाहीच, मात्र सरसकट सर्व मराठ्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात करण्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध आहे, प्रसंगी त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले त्यासाठी आमची तयारी आहे, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले. यात कुणीही राजकारण आणू नये असे देखील डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले, व हीच भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आहे.