Ajay Kandewar,Wani:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या मातोश्री श्रीमती सुनंदा मधुकरराव उंबरकर (वय ८५) यांचे आज, गुरुवार, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने उंबरकर परिवारावर तसेच वणीच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
स्व. सुनंदा उंबरकर या राजू उंबरकर यांच्या आयुष्याचा प्रेरणास्त्रोत आणि आधारस्तंभ होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच वणीतील राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी उंबरकर कुटुंबीयांशी भेट घेऊन दुःख व्यक्त केले.त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. वणी शहरात त्यांच्या आठवणींनी शोकाकुल वातावरण निर्माण झाले.
•विदर्भ न्यूज परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली…

