•पदाधिकाऱ्यांशी मतदार संघाचा आढावाही.
अजय कंडेवार,वणी :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे दि.२५ डिसेंबर रोजी विदर्भ दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान अमरावती येथील “ग्रँड मैफिल इन या हॉटेल” मध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत मतदार संघाचा आढावा घेतला. तसेच पक्षनेते राजू उंबरकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नावे सुरू केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या माध्यमातून तरुणांना, महिलांना रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून अन्य सामाजिक उपक्रमाची शृंखला राजू उंबरकर यांच्या माध्यमातून मतदारसंघांत राबविल्या जाते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करत असलेल्या कार्याची माहिती राज ठाकरे यांना देण्यात आली. तसेच या कार्याचे कौतुक करत उंबरकर यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहर उपाध्यक्ष गितेश वैद्य, जेष्ठ सहकारी विलन बोधाडकर, परशुराम खंडाळकर, सूरज काकडे, विकास पवार, अभिजीत नानवटकर यांच्यासह मतदारसंघांतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.