•मुजोर W.C.L ला मनसे शिकविणार धडा.
•फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्त्वात मनसेचा खळखट्याक आंदोलन दिसेल……
अजय कंडेवार,वणी :- वे.को.ली.च्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या तात्काळ नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याकरीता मनसेच्या वतीने 8 नोव्हें.23 रोजी निवेदन दिले होते, मात्र वेकोलीने या निवेदनाची कोणतीही दखल घेतली नाही व त्यावर कोणत्याही प्रकारचे ठोस उत्तरही दिले नाही. वारंवार निवेदन देऊनही दखल न घेतल्याने मनसेच्या वतीने गुरूवार दि.7.डिसेंबर 2023 रोजी येनाडी गावचा मुख्य रस्त्यावर खळ-खट्याक आंदोलन सकाळीं 11 वाजता मनसे नेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वाने हजारों शेतकऱ्यांना सोबत घेत उद्यापासून सुरु होत असलेल्या आंदोलनाचा गर्भित असा इशारा देण्यात आला.Under the leadership of Phalgun Gohokar,WCL will see a vigorous movement.
शेकडो शेतकऱ्यांशी चर्चा करतांना वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार….. टिपलेले एक क्षण
तालुक्यातील येनाडी, येनक, शिवनी, कोलगाव, शेवाळा या गावाजवळून वेकोलीची वाहतूक होत असून ह्या वाहतुकीचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसुन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.(कापूस एकरी 10 क्विंटल,सोयाबीन एकरी 10 क्विंटल, तूर एकरी 5 क्विंटल) त्याच बरोबर रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे विशेष बाब असताना येथील शेतकऱ्यांनी दि.1 नोव्हेंबर 2023 रोजी W.C.L प्रशासना विरोधात आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. दरम्यान च्या परिस्थितीमध्ये आंदोलकांनी शांततेची भूमिका घ्यावी, झालेल्या नुकसानाची भरपाई वे. को.ली. प्रशासनाकडून मिळवून देऊ असे आश्वासन वे. को. ली. च्या अधिकाऱ्याने लेखी दिले व यामध्ये वणीचे तहसीलदार धुळधर यांनी फोनद्वारे मध्यस्थी करून येत्या 5 दिवसात ही नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल असेही सांगितले.
मात्र, या बाबीस 8 दिवसांचा अवधी उलटूनही कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे आता मनसे या शेतकऱ्यांच्या हितार्थ मनसेने उद्यापासून आंदोलनाचे हत्यार उपसले असुन त्याबाबतीत उपविभागीय अधिकारी स्मरणपत्र देण्यात आले आणि या आंदोलनातून होणान्या सर्व आर्थिक नुकसानीस वेकोली प्रशासनच जबाबदार असेलअसा स्पष्ट निवेदनात सांगीतले आहे.(Falgun leadership)
निवेदन देताना येनक, येनाडी, जिवती, कोलगाव, शेवाळा या क्षेत्रातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.