•फाल्गुन गोहोकार यांचे नेतृत्व युवकांना आकर्षणाचीच बाब
अजय कंडेवार,वणी:- पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरीत होऊन तसेच राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वाखाली मजरा (वांजरी) गावातील असंख्य नागरिकांनी मनसेत जाहिर प्रवेश केला.


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बोलबाला असलेल्या वणी विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जोरदार इन्कमिंग पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम अतिशय झपाट्याने चालू आहेत. वणी विधानसभेत पूर परिस्थिती निर्माण झाली .त्यावेळी सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच पूर्वी त्यासाठी धावून गेली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकऱ्यांकरिता दत्तक योजना ही चालू करण्यात आली. या सर्व कामाचा झपाट चालू असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मजरा येथील असंख्य युवक व गावकऱ्यांनी प्रवेश केला . हा पक्षप्रवेश हा लोकांच्या या पाठबळाला अधिक ताकद दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास यावेळी मजरा ग्रामवसीयांनी व्यक्त केला.


प्रवेश घेत असताना गावातील अजय खिरटकर, निलेश काकडे, गणेश आवारी, दिपक मोहितकर, गणेश मोहितकर, शिवम खिरटकर, अजय महातळे, संकेत खिरटकर, मारोती गोंडे, विठ्ठल चौधरी यासह अनेकांनी प्रवेश केला. त्यात मनसेचे पुरूषोत्तम खंडाळकर, बोदाडकर, अरविंद राजुरकर, गुड्डू वैद्य, अरबाज खान, मौलाना आदि उपस्थित होते…



