• मारेगावात ईद- ए- मिलादुन्नबी उत्साहात साजरी
नागेश रायपूरे ,मारेगाव – अवघ्या देशभरात ईद -ए -मिलादुन्नबी साजरी होत असतांना मारेगाव शहरात सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मनसेच्या वतीने येथील मार्डी चौकात खीर वाटप व निशुल्क कबर खोदणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी यंग मुस्लीम कमेठीच्या वतीने शहरात भव्य जुलूस काढण्यात आला.या मिरवणुकीत नागपूर येथील मटका कव्वाली पार्टीने गायलेल्या कव्वालीने नागरिकांना मंत्रमुग्ध केले.तर फुले फेकणारी तोफ ही लक्षवेधी ठरली.
यावेळी मार्डी चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसेचे शहर प्रमुख शेख नब्बी व नगरसेविका अंजुम नब्बी शेख यांचे वतीने खीर वाटप व मुस्लिम धर्मातील धर्मगुरू, निशुल्क कबर खोदनाऱ्या समाजसेवकांचा तसेच जेष्ट नागरीकाचा शाल व पुष्पगुच्छ देऊन मनसेचे राज्या उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे,चांद बहादे, आकाश खामनकर, लाभेश खाडे ,जमीर शेख आदी मनसैनिक उपस्थित होते.