•नवरात्र उत्सवासाठी मनसे सज्ज.
अजय कंडेवार,वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दांडिया गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.शहरातील विराणी फंक्शन हॉलमध्ये दि.2 ऑक्टोबर ला “गरबा प्रशिक्षणाची “सुरुवात झाली. पुढील 12 दिवस म्हणजेच घट स्थापनेपर्यंत हे प्रशिक्षण चालणार असून दांडिया स्पर्धेने या महोत्सवाची सांगता होणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षनेते राजु उंबरकर यांच्या संकल्पनेतून वर्षभर विविध सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मनसेकडून साजरे करण्यात येणारे शिवजयंती, दहीहंडी, गुढीपाडवा, बैलपोळा, दिपोस्तव या सारखे हिंदू व मुस्लिम धर्मियांची ईद यासारखे धार्मिक व अन्य सांस्कृतीक कार्यक्रम नेहमीं चर्चेचा विषय असते. यातच आता नवरात्र उत्सवातील दांडिया गरबा हे सुद्धा वणीकर जनतेसाठी आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय बनला आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. तर यात विजयी स्पर्धकांना मौल्यवान व आकर्षक बक्षिसे देण्यात येतात. गेल्या वर्षी संपन्न झालेल्या गरबा महोत्सवात विभागातील हजारो युवतींनी व महिलांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता.