•तरुणाई सह महिला भगिनी थिरकल्या डिजेच्या तालावर
•5 हजार पेक्षा अधिक युवकांना नामवंत कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होणार – राजू उंबरकर (नेते,मनसे)
अजय कंडेवार,वणी:- पक्षनेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून वणी शहरात मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी करण्यात आली. संपूर्ण शहरात आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण बघायला मिळाले. शासकीय मैदान, वणी याठिकाणी दहीहंडीचा थरार अनुभवयास मिळाला. तसेच वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांसाठी मनसे रोजगार मेळावा २०२३ ची घोषणा करण्यात आली.गोपाळकालानिमित्त सोमवारी वणी शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून दहीहंडीचे कार्यक्रम आयोजित केले होते. यानिमित्ताने प्रसिध्द मराठी सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी उपस्थिती दर्शविली होती. या दहीहंडीसाठी प्रथम बक्षीस २ लाख ५० हजार रुपये, द्वितीय बक्षीस १ लाख रुपये, तृतीय बक्षीस ५० लाख रुपये असणार आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रातील नामांकीत गोविंदा पथकांना निमंत्रित केले. विशेष म्हणजे या ठिकाणी महिलांना विशेष आसन व्यवस्था आणि ए.आर रहमान यांच्या कार्यक्रमात वापरात असणारी म्युझिक साऊंड सिस्टम असल्याने तरुणांनी तसेच महिला भगिनींनी नाचण्याचा आनंद घेतला.
विविध जिल्ह्यातील विजेत्या गोविंदा पथकांना बक्षीस मानधन सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या शुभहस्ते आणि मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरित करण्यात आले. प्रथम क्रमांक मुंबई येथील पथकाने पटकाविला. वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांसाठी १६ सप्टेंबर पासून मनसे रोजगार मेळावा २०२३ ची पक्षनेते राजू उंबरकर यांनी घोषणा केली. ही दिवाळी वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांसाठी खास असणार आहे. 5 हजार पेक्षा अधिक युवकांना नामवंत कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमाला वणी विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेसह, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, कार्यकारणी सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसंगी उपस्थित सर्वांचे राजू उंबरकर यांनी आभार मानले.
“ऐतिहासिक मनसे दहीहंडी उत्सवात वणी विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वच घटकांचे आभारी आहे. युवकांसाठी १६ सप्टेंबर पासून मनसे रोजगार मेळावा २०२३ घोषणा केली. ही दिवाळी वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांसाठी खास असणार आहे. 5 हजार पेक्षा अधिक युवकांना नामवंत कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.”- राजू उंबरकर (नेते, मनसे)