Saturday, June 6, 2026
Homeवणीभुरकी गावात "अंगणवाडी इमारतीचे" भूमिपूजन......!

भुरकी गावात “अंगणवाडी इमारतीचे” भूमिपूजन……!

अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील विकासकामांचा अजेंडा वणी विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार संजिवरेड्डी यांनी तयार केला आहे. त्या माध्यमातून “आता गावं समृद्ध करुया” या उद्देशाने भुरकी गावात जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत नियोजन फंडातून ११ लाख २५ हजार रुपये मंजूर झालेल्या नूतन अंगणवाडी इमारत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते तसेच भुरकी सरपंच सीमा हरीचंद्र बदकी यांच्या नेतृत्वाखाली ता.16 ऑक्टोंबर रोजी संपन्न झाला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नायगाव सोसायटीचे अध्यक्ष अशोक सूर,सरपंच रांगणा प्रकाश बोबडे हे उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम यशस्वीतेकरिता उपसरपंच विनोद दानव,प्रमोद सोनटक्के,अनिता कुमरे, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप बदकी भुरकी जि.प.शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश तालावार,अमोल लांबट, राजू खोंड, रामदास आगलावे,लता झाडे (अंगणवाडी सेविका), मदतनीस कोमल देऊळकर,मदतनीस सुषमा ठाकरे व समस्त भुरकी ग्रामवासीयांनी अथक परिश्रम घेतले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page