•शिवपुराण कथेचा मंडपात हिंदू- मुस्लिम एकोप्याचे अनोखे दर्शन.
अजय कंडेवार,वणी:– धार्मिक सहिष्णुता आणि बंधुभावामुळे विविधतेत एकता हे भारताचे सांस्कृतिक सूत्र उठून दिसते. विविध जाती धर्मांच्या लोकांतील सलोखा हाच आपल्या देशाच्या ऐक्याचा पाया आहे.वणीमध्ये सुरू असलेल्या शिवमहापुराण कथा मंडपात हिंदू- मुस्लिम एकोप्याचे अनोखे असेच एक उदाहरण समोर आले आहे.
तालुक्यांतील परसोडा येथे शनिवार 27 जानेवारी पासून परसोडा येथे शिवमहापुराण कथा सोहळा सुरू झाला.या अनुषंगाने या ७ दिवसाच्या प्रवचनाला लाखो भाविकांची त्या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी गर्दी होत आहे .याच बाबींची माहिती घेत फैजान बशीर खान यांनी महाशिवपुरान कथेचा मंडपस्थळी दि.29 चा रात्री तेथील भाविकांना भेट दिली व दूर दुरून आलेल्या भाविकांशी चर्चा देखील केली असता काहीं भाविकांकडे थंडीसाठी बचावाकरीता उपयोगी वस्तू नव्हत्या त्याच क्षणी जराही विलंब न करता दुरून आलेल्या भाविकांना आपल्या कडून काही सोय करता यावी म्हणुन फैजल खान व सोहन उपाध्याय यांनी तात्काळ शहरात जाऊन 200 ब्लँकेटची खरिदी केली व कथेचा मंडपस्थळी दुरून आलेल्याना ब्लँकेटचे वाटप केले त्यातून शिवपुराण कथेत आलेल्याना हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शनही घडून आलें. फैजल खान ने केलेल्या स्तुटीमय कार्याचे कौतुक सर्वत्र होत आहे.
“हे देवाचे कार्य आहे हे समजल्यानंतर ते विना अडथळा पार पडले पाहिजे असे आमचा धर्म सांगतो. त्यामुळे या पवित्र कार्यात माझा व माझ्या कुटुंबाचाही सहभाग असावा, यासाठी आमच्या कुटुंबाने हा निर्णय घेतला व दूर दूर आलेल्या भाविकांना मायेची ऊब म्हणुन रात्रीचा वेळी शांत झोप घेता यावी म्हणुन ब्लँकेट देऊ केलें”
– फैजल बशीर खान (वणी )