• डॉ.महेंद्र लोढा व इजहारभाई शेख यांचा नेतृत्त्वात शहर काँग्रेसमय वातावरण…
•हजारोचा संख्येने रॅलीत उपस्थिती…….
अजय कंडेवार, वणी:- भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे राहुल गांधी पुर्ण भारतभर पदयात्रा गेल्या कित्येक दिवसापासून सुरू आहे. त्या निमीत्ताने वणी शहरात’ भारत जोडो’ याचा समर्थनात माजी आमदार वामनराव कासावार यांचा मार्गदर्शनात तसेच डॉ. महेंद्र लोढा व इजहारभाई शेख(जिल्हा उपाध्यक्ष) यांच्या धडाकेबाज नेतृत्त्वात दिनांक 13 नोव्हेंबर रोज रविवार ला सायंकाळीं ठीक 6 वाजता वणी येथे ‘ एकता मशाल रॅली ‘चे आयोजन करण्यात आले .
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दक्षिणेतील कन्याकुमारी येथून सुरू झालेली भारत जोडी यात्रा महाराष्ट्रात एकूण 18 दिवस चालणार आहे.या यात्रेने सुमारे 375 किलोमीटर अंतर कापले आहे. 7 सप्टेंबर रोजी दक्षिणेतील कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही पदयात्रा 61 व्या दिवशी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली. यात्रेतील सहभागींसाठी देगलूर येथील कलामंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ स्वागत समारंभानंतर सोमवारी रात्री यात्रेला पुन्हा सुरुवात झाली असून त्यात वणी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी काल दिनांक 13 नोव्हेंबर ला सायंकाळीं 6 वाजता ‘एकता मशाल’ घेऊन वणी शहरात काँग्रेसमय वातावरण डॉ. महेंद्र लोढा यांचा नेतृत्त्वात केल्याची जोरदार चर्चा आता होऊ लागली आहे. ही एकता मशाल रॅली वणितील शासकीय मैदाननातून सुरूवात करित शहरांतील टिळक चौक, खाती चौक, जटाशंकर चौक, गांधी चौक, गाडगेबाबा चौक, सरवोदय चौक,जत्रा मैदान, स्टेट बँक चौक, आंबेडकर चौक व सरतेशेवटी शिवाजी पुतळ्या समोर समारोप करण्यात आला.
या रॅलीत उपस्थीती म्हणुन.डॉ. महेंद्र लोढा, इजहार भाई शेख,आशिष खुलसंगे, प्रमोद वासेकर,पुरुषोत्तम आवारी,राजाभाऊ बिलोरिया,संजय खाडे, प्रा. मालेकर मारोती गौरकार, अंकुश महापुरे,ओम ठाकूर, जयसिंग पाटिल गौरकार, आबिदभाई हुसैन, प्रमोद निकुरे,वंदना आवारी, सविता ठेपाले, संध्या बोबडे,विजया आगबत्तलवार,मंगला झिलपे, मंदा बांगरे, संगिता खाडे, विशेष प्रमोद वासेकर, संजयभाऊ खाडे, पुरुषोत्तम आवारी, प्रा शंकर वरहाटे, जयकुमार आबड, घनश्याम पावडे,, विनोद गोडे, गजानन खापणे, अशोक धोबे, रवींद्र धानोरकर, साधना गोहोकार, शारदा ठाकरे, राजेंद्र कोरडे,काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी ,कार्यकर्ते व शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
“देशातील वाढती महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नावर कॉंग्रेसच्या वतीने अनेक ठिकाणीं देशव्यापी आंदोलन केले .देशात हुकूमशाही सुरु झाली आहे. बेरोजगारी महागाईच्या प्रश्नावर बोलणाऱ्यांना ईडीची भिती दाखवून त्यांना गप्प केले जात आहे हे कदापि सहन होणार नाही याचा नायनाट ,देशात हुकूमशाही नष्ट करण्यासाठीच ‘भारत जोडो ‘ यात्रेचा समर्थनात ही रॅली शहरात काढण्यात आली आहे असे डॉ. लोढा यांनी माहिती दिली आहे.”- डॉ. महेंद्र लोढा.