•खासदार ,माजी आमदार व काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा दिसला दम.
अजय कंडेवार, वणी:- राहुल गांधी, भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे खासदार यांच्या नेतृत्वात पुर्ण भारतभर पदयात्रा गेल्या कित्येक दिवसापासून सुरू आहे. त्या निमीत्ताने दिनांक 12 नोव्हेंबर रोज शनिवार ला सकाळी 10 वाजता वणी येथे भव्य बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
त्यात बाळुभाऊ धानोरकर, (खासदार चंद्रपुर -वणी -आर्णी मतदार संघ) व माजी आमदार वामन कासावार (वणी विधानसभा) तसेच संजय खाडे (अध्यक्ष रंगनाथस्वामी अर्बन निधी लि. वणी) व संचालक वसंत जिनींग वणी, अॅड. देविदासजी काळे वसंत जिनींग वणी, राजाभाऊ पाथ्रडकर संचालक वसंत जिनींग, टिकारामजी कोंगरे अध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक, प्राध्यापक शंकर व-हाटे , व सर्वश्री संचालक वसंत जिनींग वणी पुरूषोत्तम आवारी, इजहार भाई शेख (जिल्हा उपाध्यक्ष)बाळु सोनटक्के,प्रमोदजी वासेकर, आशिष कुळसंगे, प्रशांत गोहोकार, पलाष बोढे, तेजराज बोढे, प्रमोद निकुरे, जयकामर आबड, घनश्याम पावडे, विनोद गोडे, गजानन खापणे, अशोक धोबे, रविद्र धानोरकर, राजेंद्र कोरडे, अशोक नागभिडकर, वंदना आवारी, संध्या बोबडे, वंदना धगडी, सविता ठेपाले , साधना गोहोकार, साधना ठाकरे, आदी मोठया संख्येने बाईक रॅलीत सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या रॅलीला रंगनाथस्वामी मंदिर पासून सुरूवात झाली ते गांधी चौक, आंबेडकर चौक, टिळक चौक, बस स्टॅण्ड पासून ते बाळुभाऊ धानोरकर वरोरा रोड वणी येथील निवासस्थानी या रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत कॉंग्रेस कार्यकर्ते व सर्व स्तरातून लोकंची उपस्थिती मोठया प्रमाणात होती. खासदर बाळुभाऊ धानोरकर यांनी राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ पदयात्रेत नांदेव व वाशिम येथे मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान यानिमीत्ताने केले आहे.