•सुविधांची बोंब, साध मुरूम टाकण्यास ग्रामपंचायतकडे पैसे नाही का?
•”मीच”सर्व करेन या शब्दाचा फक्त बोम्याच का…..
अजय कंडेवार,वणी:- कायर गावातील दर गुरूवारी भरणारा आठवडी बाजाराची स्थिती दयनीय आहे. पावसाने बाजारातील सर्व रस्त्यांवर चिखल व जागोजागी तळे साचले आहे. ये-जा करण्यासाठी धड रस्ताच नसल्याने चिखलात ठेवलेल्या दगड-विटांवरून तोल सांभाळून चालताना ग्राहकांची कसरत होते. शिवाय बाजारातील चिखलातच विक्रेत्यांना भाजीपाल्याची दुकाने मांडावी लागतात. भाजीपाला खरेदी करताहेत तर आधी चिखल तुडवा, अशी शिक्षाच जणू कायर ग्रामपंचायत ग्राहकांना व स्थानिक नागरिकांना देत आहे. बजारवाडी लाखों रुपयांनी हर्रास करतात. तर त्यासाठी सुविधा काय? ग्रामपंचायत फक्त मुंग गिळून का आहे. साध मुरूम टाकून प्राथमिक सुविधा देखिल देत नाही आहे. याचा अर्थ गावातीलच नागरीकांना “नरकयातना” काय असते हे दर्शविण्याच उद्देश तर नाही ना? या दुर्लक्षित धोरणाने विकास कमी आणि बोम्या जास्त अस स्पष्ट चित्र दिसून येत आहे.
तालुक्यातील कायर येथे प्रत्येक गुरूवारी आठवडा बाजार भरतो. मात्र सध्या बाजारात चिखलाचे साम्राज्य पसरल्याने व्यापारी व ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे. चिखलामुळे येथे दलदल निर्माण झाली आहे. चिखलातून व्यापारी व ग्राहकांना मार्ग काढावा लागत असल्याने ते नाराजी व्यक्त करत आहेत. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या चिखलातून व्यापारी व ग्राहकांना मार्ग काढावा लागत आहे. तसेच कायमच्या चिखलमय रस्त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीकडून येथे येणा-या व्यापा-याकडून काही रुपयांचा कर आकारला जातो. या करापोटी ग्रामपंचायतीला लाखो रूपये कर मिळतो. मात्र व्यापाऱ्यांना कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देत नसल्याने व्यापारी नाराजी व्यक्त करत आहेत. बाजाराच्या ठिकाणी खडी टाकली तर व्यापा-यांना बसणे व ग्राहकांना फिरता येईल असे ग्राहकांचे म्हणणे आहे. मात्रमात्र ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने व्यापारी नाराजी व्यक्त करीत आहेत.
व्यापाराची दयनीय स्थिती बघा…
कायर गावची बाजारपेठ मोठी आहे. या परिसरात लोकसंख्या वाढली आहे. येथे पूर्वरत आठवडा बाजार भरत असतो. मात्र आजू बाजूला लोकसंख्या वाढीने या बाजाराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विविध संसार उपयोगी सामान खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने येतात. तर खूप दुर दुरून व्यापारी कांदा, बटाटा, भाजीपाला व कडधान्ये घेऊन येतात तर मच्छी, ओली मच्छी घेऊन मच्छीमार येत असतात. याशिवाय रेडीमेड कपडे, भांडी, मिठाई, किराणा दुकान, लहान मुलांसाठी खेळणी आदी साहित्य घेऊन व्यापारी येत असतात. संपूर्ण दिवस हा बाजार चालतो. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील आवारात हा बाजार भरतो. या बाजारात लाखोंची उलाढाल होत असते.
प्रतिक्रिया…..
“मी गेल्या अनेक वर्षांपासून या बाजारात भाजीपाला घेऊन येतो. मात्र पावसाळ्यात आमचे फारच हाल होत असतात. ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.”- नागरिक, कायर