•7 जणांवर गुन्हे दाखल…
अजय कंडेवार,वणी:- डी. बी पथकातील एका पथकाने भांदेवाडा येथे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर दि.9 सप्टे. शनिवार रोजी धाड टाकून तब्बल 7 जणांवर गुन्हे दाखल करून 54 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भांदेवाडा वेकोली येथे जाऊन सार्वजनिक ठिकाणी 7 व्यक्ती पैशाची बाजी लावुन हार जितचा कट पत्ता नावाचा जुगार खेळतांना मिळुन आले. त्यात राहुल नानाजी गोरे (वय 29 वर्ष ),2) नामदेव अर्जुन आत्राम (वय 54 वर्ष) ,3) मिलींद वसंता डंभारे (वय 45 वर्षे), 4) सुर्यभान रमेश देवाळकर (वय 26 वर्षे), 5) शंकर यादव खापणे (वय 45 वर्षे), 6) चंन्द्रभान रमेश देवाळकर (वय 30 वर्षे) सर्व रा. भांदेवाडा ता. वणी ,7) पवन शेषराव बरडे (वय 25 वर्ष, रा.निंबाळा) यांचे कडुन ताश पत्ते किंमत 50/-रू व नगदी 54,420 /- रू असा एकुण 54,740 /- रू चा मुद्देमाल मिळुन आला. या सर्वावर कलम 12 अ महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे होत असल्याने त्याचे विरूध्द वणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला .
सदरची कार्यवाही डॉ.पवन बंसोड (पोलीस अधीक्षक यवतमाळ),पियुष जगताप (अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ),गणेश किंद्रे (उप.वि.पो.अ. वणी) यांच्या आदेशाने व P.I अजित जाधव (ठाणेदार वणी) यांचा मार्गदर्शनात API माधव शिंदे, सुदर्शन वानोळे,हरिन्द्रकुमार भारती, पंकज उंबरकर, विशाल गेडाम व गजानन कुडमेथे यांनी केली.