•समाजकंटकांचा दहशत माजविण्याचा प्रयत्न असा स्पष्ट आरोप
•पोलिसांसमोर समाजकंटकांना पकडण्याचे आव्हान.
अजय कंडेवार,वणी:– शहरात असलेल्या प्रगतींनगर येथे रविवारी (दि.30) पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास काही अज्ञात समाजकंटकांनी घराबाहेर उभी असलेली चारचाकी महेंद्रा बोलेरो गाडीचे काच दगडाचा सहाय्याने फोडून ज्वलनशील पदार्थ ओतून जाळून दहशत माजविण्याचा तसेच राजु तूराणकर यांच्यावर भ्याड हल्याचा प्रयत्नासाठी आले असावे असा संशयही व्यक्त करीत आजूबाजूला चर्चाही सुरू आहे.Bolero lit by a trusted unknown. A clear allegation of trying to terrorize the society.Challenge before the police to catch the sociopaths.
यवतमाळ रस्त्यावरील येथील एका रोपवाटिकेचे व्यवसाय करणारे तसेच माजी नगरसेवक तसेच लोकवाणी जागरचे संपादक राजू किसन तुराणकर प्रगतीनगर येथे राहात असून, शनिवारी रात्री 9 वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे महिंद्रा बोलेरो क्रमांक (एमएच 31 सीएस 7900 ) घराबाहेर उभी केली होती.रविवारी (दि.30) पहाटे 2.30सुमारास पाऊस सुरू असताना काही समाजकंटकांनी चारचाकी महेंद्रा बोलेरो गाडीतील काच दगडाचा सहाय्याने फोडून ज्वलनशील पदार्थ ओतून जाळून दहशत माजविण्याचा तसेच राजु तूराणकर यांच्यावर भ्याड हल्याचा प्रयत्नासाठी आले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे अशीही खमंग चर्चा शहरात जोऱ्यात सुरू आहे.
गाडीतून धूर निघत असल्याची ही बाब लक्षात येताच काही वेळाने गाडीच्या काचा फुटल्याने जोराचा आवाज झाला व आजूबाजूला राहणारे नागरिक जागे झाले. गाडी जळाल्याचे समजताच. तोमदेव तुराणकर यांनी घराबाहेर आधी धाव घेतली असता चारचाकी जळताना दिसली. काही वेळातच घरचे सर्व उठले व आजूबाजूच्यानी धाव घेत पेटलेली चारचाकी महेंद्रा बोलेरो चारचाकी तेथील लोकांनीच विझविली.ही सदर माहिती पोलिसांना कळविली. पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करीत पोलीस स्टेशन येथे अज्ञाताविरुद्ध रितसर तक्रार नोंदविण्यात आले व अज्ञात आरोपिविरुद्ध गून्हा दाखल करण्यात आला.
भरवस्तीत घडलेल्या चारचाकी जाळपोळीच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.विशेष म्हणजे दहशत माजविणारे हे राजु तूराणकर यांच्यावर भ्याड हल्याचा प्रयत्नासाठी आले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे अशीही खमंग चर्चा शहरात जोऱ्यात सुरू आहे.घटनेत परिसरात राहणाºया गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संशयितांचा हात असल्याची चर्चा सुरू असून, त्यांनी हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.