•रोख रक्कमेसह दागिने केले लंपास…
अजय कंडेवार,वणी:- शहरातील भोंगळे लेआऊट येथिल परिसरात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी ईश्र्वर गणपत वडस्कर या शिक्षकाचा घरी काल दिनांक 18 सप्टेंबर ला रविवारी दुपारचा सुमारास झाल्याची घटना घडली.त्यात चोरट्यांनी ४० हजार रुपये रोख व सोन्याचे दहा ग्राम दागिने( टॉप, मंगळसूत्र व अंगूठी) लंपास केले.
काल दिनांक १८ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणूक डूटी करिता शिक्षक ईश्वर वडस्कर हे निवडणूक कामाकरीता मारेगाव येथे सकाळी गेले होते तर पत्नी ललिता वडस्करया देखील मतदान हक्क बजाविण्याकरिता राहत्या गावी मच्छिंद्रा गेली होती. जेव्हा ती सायंकाळी 5 वाजता दरम्यान घरी आली असता, घराच्या दाराची कडी तुटलेली आढळली.
त्यांनी घरात जाऊन पाहीले असता ,घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पसरलेले आढळले, घरातील कपाटामध्ये ठेवलेले ४० हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने, ब्लॉकेट चोरी गेल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच ११२ वर फोन करून पोलिसांना माहिती दिली,वणी पोलिस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी प्राथमिक चौकशी सुरु केली व वडस्कर यांनी रितसर पोलीस स्टेशन गाठत
अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला.