अजय कंडेवार,वणी:- नवकार नगर ते मनिशनगर येथे वाघाची चर्चा जोरदार सुरु असतानाच वाघाचे दर्शन नागरिकांना होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातलीच एक घटना वणी येथील ब्राह्मणी शिवारात 35 वर्षीय बिहार येथील मजूर उमेश पासवान वय (35) याच्यावर वाघाने हल्ला केल्याची घटना गुरुवारी पहाटे 4.30 चा सुमारास घडली.वाघाचा हल्ल्यात तो व्यक्ती अतिशय गंभीर जखमी झाला आहे.
हा व्यक्ती सकाळीं अन्य मजुरांसह टॉवर उभारणी साठी कामाकरीता गेला असता त्याचा वर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढविला असता तिथे असलेले मजूर ओरडायला सुरूवात केल्याने त्या मजुराच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. त्यावर वणी येथील लोढा हॉस्पिटल येथे डॉ. महेंद्र लोढा यांनी उपचार सुरु केले आहे. असे वाघाचे हल्ले फार चिंतेची बाब असुन वनविभाग आता ही सुस्त दिसुन येत आहे त्यावर माञ काहीही उपायोजना नाममाञ करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वाघाला जेरबंद करण्याची गावकऱ्यांची मागणी होत आहे.