Saturday, April 18, 2026
HomeUncategorizedब्रेकिंग : प्रभाग 8 मध्ये भाजपचे उमेदवाराला धक्का........

ब्रेकिंग : प्रभाग 8 मध्ये भाजपचे उमेदवाराला धक्का……..

Ajay Kandewar,Wani : नगरपरिषद निवडणुकीच्या निर्णायक दिवशी प्रभाग 8 मध्ये राजकीय समीकरणे अक्षरशः उलटी फिरल्याचे चित्र समोर येत आहे. सकाळपासून सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक बूथवर भाजप उमेदवारावरील रस कमी होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.मतदारांचे लक्ष इतर पर्यायांकडे झुकत असल्याने भाजपच्या गोटात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही केंद्रांवर उमटलेली मतदार चळवळ पाहता भाजपला मिळणारा पाठिंबा अपेक्षेपेक्षा लक्षणीय कमी असल्याचे राजकीय निरीक्षक सांगत आहेत.

स्थानीक पातळीवर गेल्या काही दिवसांपासून दिसत असलेली नाराजी, संपर्क मोहिमेतील कमतरता आणि जनतेच्या प्रश्नांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे मतदानादिवशीच परिणाम दिसून आल्याची चर्चा जोर धरत आहे.मतदारांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे प्रभाग 8 मध्ये भाजपची स्थिती अनिश्चिततेत ढकलली असून, इतर उमेदवारांच्या संधी अचानक वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.संध्याकाळी होणाऱ्या अधिकृत आकड्यांनंतरच ‘कल’ की ‘निकाल’ — यावर अंतिम चित्र स्पष्ट होईल, मात्र प्रभाग 8 च्या मैदानात भाजपची पकड सैल होत असल्याचे संकेत दिवसभर मिळत राहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page