Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsब्रेकिंग : पत्रकार रवी ढुमणे आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात पोलिसांची दिरंगाई...

ब्रेकिंग : पत्रकार रवी ढुमणे आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात पोलिसांची दिरंगाई का…?

Ajay kandewar,Wani:- शहरातील निर्भीड क्राइम रिपोर्टिंगसाठी ओळखले जाणारे पत्रकार रवी ढुमणे यांच्या आत्महत्येने संपूर्ण शहर सुन्न झाले असतानाच, या प्रकरणात आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. घटनेनंतर उपलब्ध झालेल्या व्हॉट्सॲप संदेशासह सुसाईड डायरीत एका व्यक्तीचे नाव स्पष्टपणे समोर येत असतानाही, नातेवाईकांनी दिलेल्या गंभीर व दखलपात्र गुन्ह्याच्या तक्रारीवर अद्याप वेळेत गुन्हा दाखल न झाल्याने पोलिसांची दिरंगाई का होत असा सवाल नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.

तक्रार दिल्यानंतरही तपासाची गती अत्यंत संथ का आहे, याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू असून नेमकं कारण काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांपासून पत्रकार बांधवांपर्यंत उपस्थित केला जात आहे. एवढे गंभीर आरोप आणि आत्महत्येसारखा संवेदनशील प्रकार असताना कारवाईला विलंब का होत आहे, कोणाचा दबाव तर नाही ना? असा थेट सवालही आता ऐकू येत आहे.

रवीचा “विठ्ठलाकडून” नातेवाईकांची न्यायाची अपेक्षा बाळगून नातेवाईक आणि नागरिक पोलिसांकडे पाहत असताना, पत्रकाराचा आत्महत्याच एवढा मोठा कारण समोर आलं असूनही तपासात होणारी ही दिरंगाई निर्माण करणारी ठरत आहे. निर्भीड पत्रकाराच्या मृत्यूमागील सत्य बाहेर येणार की नाही, हा प्रश्न आता संपूर्ण शहराच्या मनात घर करून बसला आहे. आणि तसेच त्या विक्की सेठ याला मोठे मासे गळाला लागले असल्याची खमंग माहिती समोर येत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments