•अवघ्या 24 तासांत पोलिसांनी लावला खुनाचा छडा..
अजय कंडेवार,वणी:- चारित्र्याच्या संशयावरून बॉयफ्रेंडनं आपल्याच प्रेयसीची हत्या केल्याची घटना वणी येथे घडली . कृष्णा अपार्टमेंट मध्ये एका मुलीचा अर्धनग्न मृतदेह आढळून आला होता, त्यानंतर वणी पोलिसातील डी. बी पथक प्रमुख माधव शिंदे व त्यांचा चमूने कसून तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळं आणि त्याच्या तपासानंतर समोर आलेल्या सत्यतेनंतर परिसरात एकच खळबळच उडाली आहे.’Boyfriend killed girlfriend. Because read this. In just 24 hours, the police set up a murder plot..
कारण वाचा….!
वणी येथील कृष्णा अपार्टमेंट आवारात खून करण्यात आला होता, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर चारित्र्याचा संशयावरुन बॉयफ्रेंडनंच गर्लफ्रेंडची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीवरून आरोपी विनोद रंगराव शितोळे रा. शिरोळी, पो.स्टे.कुरुंदा, ता. वसमत, जि. हिंगोले.याला डी.बी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.मृतक हिची फेसबुक द्वारे विनोद याच्या सोबत ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले असुन नमुद तिच्या प्रियकर यानेच तिचा घातपात करुन गावी पळुन गेला असल्याची माहीती प्राप्त झाली. परंतु नमुद आरोपीचे नावा व्यतरीक्त कोणताही उपयुक्त माहीती नसतांना तसेच नमुद आरोपी हा बाहेर जिल्हयातील राहणारा असुन सुध्दा पो.स्टे. वणी येथील अधिकारी व कर्मचारी यांनी आपले बुध्दी कौशल्याचा वापर करुन नमुद आरोपीची माहीती काढुन त्यास त्यास त्याचे मुळ शिरोळी ता. वसमत जि. हिंगोली येथुन चौकशी करीता ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, मागील काही महिन्यांपासून आरोपी विनोद हा मृतक प्रिया बागेसर उर्फ आरोही वानखेडे हिचा सोबत फ्लॅट मध्येच राहत होता. तो एका खाजगी कंपनीत ड्राइव्हर म्हणून करीत होता. मागील काही दिवसापासुन जेव्हां तो घरी यायचा तेव्हा प्रेयसी मृतक प्रिया ही फोनवरच राहायची व अनेकांचे फोन यायचे तो विचारायचा पण ती उडवाउडविचे उत्तरे द्यायची आणि नेहमी वाद व्हायचा.. मैं तेरे लिये अपनो को छोडा तूने मुझे ये सिला दिया….! अशीच स्थिती.. घटनेचा रात्री खुप भांडण झाले आणि तिला मारहाण केली त्यादरम्यान ती खाली पडली व त्याने तिचे डोके जमिनीवर आदळले व गळाही दाबला... शेवटी हालचाल बंद झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तेथुन त्याच स्थितीत दरवाजा बंद करून निघून गेला.चारित्र्याचा संशयावरुन बॉयफ्रेंडनंच गर्लफ्रेंडची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.आरोपीने गुन्हयाची कबुली दिली. पुढील तपास सपोनि दत्ता पेंडकर पोस्टे ,वणी हे करीत आहेत.
सदरची कारवाई डॉ.पवन बन्सोड, पोलिस अधिक्षक यवतमाळ,पियुष जगताप (अपर पोलिस अधिक्षक यवतमाळ),गणेश किंद्रे (उपविभागीय पोलिस अधिकारी वणी) यांच्या मागदर्शनाखाली पो.नि. प्रदीप शिरस्कर, सपोनि माधव शिंदे, सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि अशिष झिमटे, पोउपनि प्रविण हिरे, कांबळे ,गजानन होडगीर, अविनाश बानकर, अमोल अन्नेरवार, विजय वानखेडे , इकबाल ,सागर सिडाम,भानुदास हेपट, अकाश अवचारे, शुभम सोनुले व पोस्टे वणी यांनी केलेली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास सुरू आहे.