•इरशाद खान यांची वणी वाहतूक विभागाला तंबी.
अजय कंडेवार,वणी:- महाराष्ट्र शासनाने स्कूल बस चालक-मालक व संस्थांना जी नियमावली आखून दिलेली आहे त्या संपूर्ण नियमावलीचे तंतोतंत पालन करून स्कूल बसने परिसरामध्ये विद्यार्थ्यांना ने-आण करत असेल तरच त्या स्कूल बसला वाहतूक करण्यास परवानगी देण्यात यावी,अन्यथा वाहतूक सेना मनसे स्टाईलने आंदोलन पुकारेल असा गंभीर इशारा देत दि.22 सप्टेंबर रोजी मनसे नेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनात वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी वणी वाहतूक शाखा प्रमुख सिता वाघमारे यांना निवेदनाद्वारे साकडे घातले.Stop the unscrupulous school bus driver-owner otherwise.Irshad Khan’s transfer to the Transport Department.
शाळा सुरू होऊन 3 महिने लोटले असुन स्कूल बसमधून मुलांचा शाळेपर्यंतचा प्रवास सुरू झाला आहे. एकाच परिसरातील तथा नगरातील मुले स्कूल बसमधून शाळेत ये-जा करतात. वाहनाचे भाडे परवडावे म्हणून वाहन चालक तथा स्कूल बसचालक क्षमतेपेक्षा अधिक मुलांची वाहतूक करत आहेत. पालकही कमी शुल्क द्यावे लागते म्हणून त्याकडे लक्ष देत नाहीत. मात्र, चिमुकल्यांच्या जिवाशी खेळणारा हा गंभीर प्रकार थांबायला हवा आणि त्यासाठी वणी वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी मनसे वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी केला आहे.स्कूल बस असो वा अन्य कोणत्याही वाहनातून प्रवास करताना वाहन चालकाच्या बाजूला किमान एक व्यक्ती बसू शकते, असा नियम आहे. पण, स्कूल बसमध्ये त्या ठिकाणी तीन मुले बसलेली दिसतात. त्यांचे दप्तर ठेवण्यासाठी स्वतंत्र स्टॅंड असावे, असादेखील नियम आहे. पण मुलांना त्यांचे दप्तर घेऊन दाटीवाटीत बसून प्रवास करावा लागतोय. बहुतेक नियमांचे पालन न करताच स्कूल बसमधून चिमुकल्यांची वाहतूक सुरू आहे. अनेक वाहनचालक मोबाईलवर बोलत वाहन चालवितात, असेही चित्र आहे. चिमुकल्यांच्या जिवाशी खेळून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त स्कूल बस तथा शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी ठोस कारवाई करावी, अन्यथा भविष्यातील धोक्याला त्यांचीच यंत्रणा जबाबदार ठरेल, असा इशारा मनसे वाहतूक सेनेने दिले आहे.2016 साली झालेल्या वणी बायपास मार्गावरील अपघाताची घटना वणीकरांच्या मनातून कधीही न निघणारी आहे ,अशा मन हेलावणाऱ्या घटना पुन्हा होऊ नये .या हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी वाहतूक विभागाला चांगलेच धारेवर धरले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे वणी शम्स सिद्दिकी,असलम खान,आकाश दूधकवडे ,युनूस सय्यद ,अयाज खान यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.