Ajay Kandewar,Wani:- वाहतूक नियम धुडकविणार्या बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक केला आहे. 21 डिसेंबर ते 1 जाने.पर्यंत वणी वाहतूक पोलिसांनी नियमभंग करणार्या 634 पेक्षा जास्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करीत अवघ्या 10 दिवसांत 5लाख52 हजाराचा वर दंड वसूल केला आहे.
वणी वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यात अवैध प्रवासी वाहतूक,ट्रिपल शिट, रॅश ड्रायव्हींग,अल्पवयीन चालक, मॉडीफाईड सायलेन्सर,ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह, विना नंबर प्लेट,जास्त प्रवासी कारवाई, उल्लंघन करून पळून जाणारे,लायसन्स नसलेले अश्या चालकांविरुद्ध कारवाई तीव्र केली . विशेष वणीत धूम स्टाईल चालविण्याचे प्रमाण वाढले असून, अशा प्रकारच्या बेजबाबदारपणामुळे गंभीर स्वरूपाच्या अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जबरदस्त पद्धतीने वणी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम 21 डिसेंबर रोजी सुरू केली असून 1 जाने 2025 रोजी पर्यंत या 10 दिवसांत 634 वाहनचालकांविरुद्ध कारवाई करून 5 लाख 52 हजार 550 रुपयांचा दंड वसूल केला आहे. अशीच कारवाई सूरू राहणार तर नक्किच वाहतूकोंडी व मुजोर धूमबाईकस्वारावर आळा बसणार असे जनतेतून बोलल्या जात आहे.ही कारवाई Dysp गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात वणी वाहतूक शाखा प्रमुख API सीता वाघमारे यांचे नेतृत्वात वाहतूक पोलीस कर्मचारी गोपाल हेपट, सुमित गौरकार, महेश राठोड, किशोर डफळे, प्रदीप भानारकर, रुपाली बदखल, प्रमोद मडावी, माधुरी भानखेडे, जयश्री गोडे, वासाडे, नवनाथ कल्याणकर, विठ्ठल भंडारे, संतोष फुलवले यांनी केली.
• वणी वाहतूक शाखेचा करण्यात आलेल्या कारवाया……
•विना नंबर प्लेट – 17 वाहनांवर 8 हजार 500 रुपये दंड.
•लायसन्स नसलेले –8 चालकांवर 40 हजार रु दंड
• ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह – 16 केसेस
• जंम्पीग(उल्लंघन करून पळून जाणाऱ्या)- 59 वाहनांवर 35 हजार 500 रु.
• ट्रिपल शिट– 42 जणांकडून 42 हजार रु दंड वसूल
•मॉडीफाईड सायलेन्सर– 2 जण,2 हजार दंड
• रॅश ड्रायव्हींग- 5 बाइकर्स कडून 5 हजार रु. दंड
• अल्पवयीन चालक– 28 केसेस,1 लाख 40 हजार रु.
•अवैध प्रवासी वाहतूक – 44 केसेस
•एकूण कारवाई– 624
• एकूण वाहन चालकांवर 5 लाख 52 हजार 550 रुपयांचा दंड.