● पालकमंत्र्यानी दिले लेखी आश्वासन…….
● पत्रकार परिषदेत केली भूमिका स्पष्ट “हक की लढाई लडेंगे और जितेंगे भी…… “
अजय कंडेवार,वणी :-राजूर बचाव संघर्ष समितीच्या वतीने 17 ऑक्टोबर 2022 ला चार महिलांचे बेमुदत आमरण उपोषण सतत 8 दिवस चालले होते. दिवाळीचा पर्व पाहता यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांचा लेखी विनंतीनुसार या उपोषण तूर्तास स्थगिती करण्यात आले.त्याअनुषंगाने समोरील भूमिका काय असेल ? याबाबत वणी येथील विश्रामगृह येथे राजूर बचाव संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषद दिनांक 29 ऑक्टोंबर ला दुपारी 3.30 ला आयोजित बैठक संपन्न झाली.
राजूर येथे रेल्वे व वेकोलीचा माध्यमातून राजूरवासीयांच्या मूलभूत हक्कावर होत असलेल्या पिळवणूकीवर राजूर बचाव संघर्ष समितीचे वतीने बेमुदत आमरण उपोषणाला वणी येथील उपविभागीय कार्यालयासमोर 17 ऑक्टोबर 2022 ला उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती व उपोषणाला चार महिलांनी सुरुवात केली व ते आंदोलन सतत 8 दिवसही चालले. ह्या आमरण उपोषणाला दिशा अमृत फुलझेले, नाजूका प्रशांत बहादे, वीणा अमर तितरे व शालू संजय पंधरे ह्या बसल्या होत्या. यांची शारीरिक परिस्थितीही 8 व्या दिवशी अतिशय खालावली होती. परंतु ऐन लक्ष्मीपूजनाचा दिवशी पालकमंत्रानी दिलेल्या लेखीपत्रात त्यांनी स्पष्ट सांगितले की वेकोली ,रेल्वे प्रशासन व प्रदूषण विभागाला एकत्र बैठकीला बोलावण्यात येईल व पुनर्वसनाचा तसेच गावसंदर्भात आढावा बैठक राजूर बचाव संघर्ष समितीसोबत घेऊन निर्णय निकाली लावू असे पत्रकात लेखी स्वरुपात दिलेले आहे. म्हणून या उपोषणाला तूर्तास स्थगिती देण्यात आली. ह्या उपोषणाला वणीतील अनेक संघटना व विविध पक्षांनी भेट देऊन राजूर वासीयांच्या हक्काच्या लढाईला समर्थन करून संघर्षात सोबत असल्याचे वचनही दिले. त्यांचे आभारही राजूर बचाव संघर्ष समितीने केले.
जर पालकमंत्र्यांचा होणाऱ्या बैठकीत गावसंदर्भात होकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर यापुढेही हे आंदोलन संवैधानिक उग्र स्वरूपाचे असेल व याची सर्वस्वी जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार, खासदार व स्थानिक मुजोर प्रशासन असेल असे स्पष्ट माहिती पत्रकार परिषदेत राजूर बचाव संघर्ष समितीच्या सर्व सदस्यांनी दिले.परंतु स्थानिक प्रशासनाने अनेकदा डोळेझाक करीत असल्याचे स्पष्ट दिसून आले परंतु न्याय मिळेपर्यंत राजूर बचाव संघर्ष समितीचे सदस्य शांत बसणार नाही. असे खंबीर मत व्यक्त केले.या पत्रकार परिषदेत सर्व पत्रकार बंधु व राजूर बचाव संघर्ष समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.