•सुनील निकाळजे (कृषी अधिकारी) यांचे आवाहन.
माणिक कांबळे /मारेगाव:- सध्या शेतकऱ्यामध्ये खरीप पेरणीची लगबग सुरु झाली आहे.मात्र शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिये नंतरच पीक पेरणी करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुनील निकाळजे यांनी केले आहे.Crop should be sown only after seed processing.. Appeal by Sunil Nikalje (Agricultural Officer).
बिजप्रक्रियेशिवाय खरीप पेरा केल्यास सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव होऊन मोठे नुकसान होते. खोदमाशीचा प्रतिबंध करण्यासाठी फवारणीचा खर्च वाढतो. त्यामुळे बीजप्रक्रिया करताना बुरशी नाशक थिओफेनेट मिथाइल ४५% + पायराक्लोस्ट्रोबिन ५% एफएस, थायोमेक्झाम ३४टक्के एफएस हे कीटकनाशक १०मिली प्रति किलो बियाण्यास लावावे.तसेच सोयाबीनसाठी नत्र स्थिर करण्यास व स्फूरद उपलब्ध करून देण्यासाठी रायझोबियम व पी.एस.बी. हे जैविक घटक प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बियाण्यास लावावे. बीजप्रक्रिया म्हणजे एकप्रकारे लसीकरण आहे. पेरणीवेळी वाफसा, यंत्र, ट्रॅक्टर आदींची जुळवाजुळव तसेच जास्त क्षेत्र असेल, तर गडबड होते. अशा वेळी अनेकजण बीजप्रक्रिया करण्यास टाळाटाळ करतात किंवा केली तरी ती योग्य प्रकारे होत नाही.त्यासाठी रासायनिक बीजप्रक्रिया ही पेरणीच्या आठ दिवस आधीच करून ठेवावी. बीजप्रक्रिया करताना एकेक पोत्याला औषध लावावे. (जास्त बियाणे घेऊन एकत्र लावले, तर सगळीकडे चांगल्या प्रकारे वबियाण्याला औषध एकसारखे लागत नाही).औषध मिसळताना हातातप्लॅस्टिक पिशवी घालावी, डोळ्याला गॉगल लावावा, तसेच तोंडाला मास्ककिंवा रुमाल बांधावा, असे आवाहन केले.
जैविक बीजप्रक्रिया पेरणीच्या आधी १ ते २ तास करून बियाणे सावलीत सुकवावे. तूर पिकाच्या बियाण्याला’ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सोयाबीनसाठी काही संयुक्त औषधे उपलब्ध आहेत यात कीटकनाशक व बुरशीनाशक एकत्र आहे. याचा वापर प्रभावी व परिणामकारक ठरेल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सुनील निकाळजे यांनी दिली आहे.