Ajay Kandewar,Wani:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधारेमुळे मनात समतेचे, ज्ञानाचे आणि स्वाभिमानाचे तेज प्रज्वलित करणारे ठरत आहे. आमच्या शिकण्याच्या प्रत्येक श्वासात बाबासाहेब आहेत, अश्या भावना मॅकरून शाळेचा मुख्यद्यापिका शोभना यांनी मनोगत व्यक्त करत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ही केले.

वणी शहरातील मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सीबीएसई स्कूल मध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक समतेचे महान पुरस्कर्ते, आणि शिक्षण, स्वातंत्र्य, बंधुता यांचे प्रतीक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पारंपरिक आणि वैचारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेला मेणबत्त्यांनी उजळवून डॉ.आंबेडकर यांचा प्रतिमेला हार अर्पण केले आणि सशक्त घोषणांनी त्यांच्या विचारांना अभिवादन करून करण्यात आली.

संपूर्ण शाळा परिसर “जय भीम” च्या जयघोषाने भारावून गेला. या कार्यक्रमात श्रद्धा निखाडे व रुपाली घाटे यांनी बाबासाहेबांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशबू शेख यांनी केले. यावेळी समस्त शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

