• दुचाकीस्वार गंभीर जखमी.
माणिक कांबळे /मारेगाव :- शहराच्या मध्यभागातून गेलेल्या राज्य महामार्गावरील खडकी बसस्थानक जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वारालाअज्ञात वाहनाने धडक दिली यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 30 मे 2023 रोज मंगळवारला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली.An unknown vehicle collided near the bus stand..Bike rider seriously injured
सुरेश हरबा टेकाम (35) वर्षे रा.वागदरा (वसंत नगर) ता.मारेगांव जि.यवतमाळ असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असुन तो आज दुचाकीने काही कामानिमित्त मारेगांव येथे आले होते.मारेगांव येथील काम आटोपून आपल्या गावाकडे वागदरा (वसंत नगर)येथे परत जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर वाहन पसार झाले.अपघात होताच रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांनी व स्थानिकांनी लगेच मारेगांव पोलिसांना घटनेची माहिती दिली.
त्यांना लगेच मारेगांव येथेल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर केल्याची माहिती आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.