Tuesday, February 17, 2026
HomeBreaking News"बजाज फायनान्स"च्या कॉल आला अन्......" 

“बजाज फायनान्स”च्या कॉल आला अन्……” 

Ajay Kandewar,Wani : डिजिटल युगात “बजाज फायनान्स” कंपनीच्या नावाने फोन करून नागरिकांच्या बँक खात्यातून हजारो रुपये लुबाडणाऱ्या ऑनलाइन टोळीने आता वणी शहरात हातपाय पसरवले आहेत. याच फसवणुकीचा बळी ठरल्या आहेत – वणी येथील मोना अरुणकुमार पाटील.

मीना पाटील यांनी पोलिस निरीक्षक, वणी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीनुसार,त्यांना बजाज फायनान्सकडून वैयक्तिक कर्ज मंजूर झाल्याचे सांगत काही संशयास्पद व्यक्तींनी संपर्क साधला. त्यांनी स्वतःला “बजाज फायनान्स शाखा वणी” येथील अधिकारी असल्याचे सांगून बँक तपशील, आधार क्रमांक, पॅन क्रमांक मागवला.विश्वासात घेऊन माहिती दिल्यानंतर त्यांच्या खात्यातून ₹88,645 व ₹3541 अशी दोन मोठी व्यवहार रकमेची कपात झाल्याचे आढळले. एकूण ₹92186 इतकी रक्कम काही क्षणांतच गायब झाली.या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे – आरोपींकडून केलेला कॉल हा “बजाज फायनान्स ऑफिस” असा डिस्प्ले दाखवणाऱ्या नंबरवरून आला होता. त्यामुळे तो अधिकृत कॉल असल्याचा भास निर्माण झाला आणि अर्जदारांनी त्यावर विश्वास ठेवला.त्यानंतर आरोपींनी “आपले ECS अपडेट करायचे आहेत किंवा आपले कर्ज मंजूर झाले आहे”असे सांगत लिंक पाठवली. ती लिंक क्लिक करताच बँक खात्यातील रक्कम त्वरित गायब झाली.

फसवणूक झाल्यानंतर संबंधितांनी जेव्हा मूळ बजाज फायनान्स कार्यालयाशी संपर्क केला, तेव्हा अशी कोणतीही प्रक्रिया किंवा कॉल कंपनीतून गेलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.वणी शहरात गेल्या काही महिन्यांत अशा ‘बँक अपडेट’,‘कर्ज मंजूरी’,‘क्रेडिट स्कोअर सुधारणा’ या नावाखाली ऑनलाइन फसवणुकीच्या अनेक तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.अनेक नागरिक अजूनही “कंपनीचे नाव पाहून” फसतात आणि काही क्षणांत त्यांचे आयुष्यभराचे साठवलेले पैसे हॅकर्सच्या खात्यात जातात.

“बजाज फायनान्स”च्या नावाखाली कोणत्याही कॉलवर विश्वास ठेवू नका. मला फोन आला तेव्हा सर्व काही अधिकृत वाटत होते, पण काही क्षणांतच माझी बचत लुटली गेली. वणी पोलिसांनी या प्रकरणात त्वरीत FIR दाखल करून तपास करावा असे अर्जदार मीना पाटील यांनी आपल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे. यावर वणी पोलीस सायबर विभाग चौकशी करीत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments