•खून झाल्याचे प्राथमिक निष्पन्न.
•पोलिसांसमोर मोठे आवाहन…
अजय कंडेवार,वणी :- शहरातील जैन ले आऊट येथील ब्राह्मनी फाटा रोडचा दिशेने असलेले कृष्णा अपार्टमेंट मध्ये एका तरुणीचा खून (Girl Murder) झाल्याची घटना समोर आली. या तरुणीचा मृतदेह (Deathbody) बंद खोलीत कुजलेल्या अवस्थेत सापडला. प्रिया देवानंद बागेश्वर उर्फ आरोही वानखेडे (वय अंदाजे 24 वर्ष) ( रा.वरोरा ,जिल्हा-चंद्रपूर ) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी गणेश किंद्रे व पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांनी दिलेली माहिती अशी, ही तरुणी काही वर्षांपासून वणी येथे राहत होती. ती शिकायला इथे आल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, रविवारी (ता. 29) सकाळीं ती राहत असलेल्या खोलीतून उग्र वास येत होता. यामुळे परिसरातील नागरिकांनी घर मालकाला दिली असता त्यांनी पोलिसांना माहिती दिली.The dead body of a young woman was found in a locked room….! Preliminary findings of murder.A big appeal to the police…
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी बंद दरवाजा उघडला. त्यानंतर खोलीतील दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजा काढल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मृतदेह अर्धनग्न स्थितीत तसेच आजूबाजूला काही वस्तू पडलेल्या अवस्थेत तसेच पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता.प्राथमिक अहवालानुसार खून नेमका कशाने केला , कोणी केला? हे अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही बाब स्पष्ट होईल, असे पोलीस निरिक्षक प्रदिप शिरस्कर यांनी सांगितले.दरम्यान, वणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.