•”फॅशन शो” मध्ये वणीची आयशा इम्रान शेख अव्वल….
•केजीएफचा अभिनेत्री अर्चना जोईस यांच्या उपस्थिती बक्षीस वितरण सोहळा
अजय कंडेवार, वणी:- वन डे टॉप थ्री इव्हेंट अॅन्ड एन्टरटेनमेंट च्या वतीने वणी येथील बाजोरिया लॉन येथे फॅशन शो तसेच नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील मॅकरून शाळेचा कलावंतांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. इतका यशस्वी आणि भव्यदिव्य फॅशन शो प्रथमच वणी येथे संपन्न झाला. विशेष म्हणजे प्रसिध्द चित्रपट केजीएफ मधील अभिनेत्री अर्चना जोईस यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.
25 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यन्त फॅशन शो तसेच नृत्य स्पर्धेचे आयोजन वणी येथील बाजोरीया लॉन येथे करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी ऑनलाईन ऑडीशन घेण्यात आले. नृत्य स्पर्धेसाठी वय 10 ते 17 तसेच 18 ते 30 असे वयोगट करण्यात आले होते. फॅशन शो मध्ये लहान मुले वय 5 ते 10, किशोर वयीन मुले वय 11 ते 17 तसेच मिस्टर, मिस तसेच मिसेस साठी 18 ते 30 वयोगट करण्यात आला होता. नृत्य स्पर्धेत वयोगट 10 ते 17 मध्ये रीधी राऊत प्रथम, विभुती सवई व्दितीय तसेच जिवीका चौधरी ने तृतीय क्रमांक पटकविला. वय 18 वरील वयोगटात शुभांगी गोगुला प्रथम, वैदेही मोडक व्दितीय तसेच कुनाल पेंदोर याने तृतीय क्रमांक पटकविला. फॅशन शो मध्ये वयोगट 5 ते 10 मध्ये आयशा शेख प्रथम, संध्या राईकवार व्दितीय, स्वरा पवार तृतीय तसेच हुसैन अहमद याने तृतिय क्रमांक पटकविला.
वयोगट 10 ते 30 मध्ये कोमल तगडपल्लीवार प्रथम, जिया कटारीया व्दितीय, भारती प्रसाद तृतीय तसेच तरुणांमध्ये आशिष देठे प्रथम आणि गौरव नयनवार याने व्दितीय क्रमांक पटकविला. या सर्व विजेत्या स्पर्धकांना केजीएफ चित्रपटात नायकाच्या आईची भूमिका केलेल्या अर्चना जोईस हिच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन वन डे टॉप थ्री चे राहुल राजु सोरते यांनी केले होते. प्रेक्षकांनी कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याने आयोजकांनी त्यांचे आभार मानले