•4 महिन्यापासून पोलीसांचा हातात देत होता तूरी..
अजय कंडेवार,वणी:– गुन्हेगार कितीही हुशार असला आणि कितीही पळण्याचा प्रयत्न केला तरीही पोलीस त्याला शोधून काढतातच अशा अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. दरम्यान 4 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका फरार आरोपीला वणी (Wani) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 4 महिने फरार राहिलेल्या आरोपीला पोलीस पथकाने शुक्रवारी दिपक चौपाटी परिसरातून अटक केली आहे. शेख सद्दाम शेख उस्मान (वय २८ वर्ष )रा.खरबडा मोहल्ला,वणी असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
सदरची कार्यवाही P.I अजित जाधव (ठाणेदार,वणी) यांचा मार्गदर्शनात A.P.I माधव शिंदे, सुदर्शन वानोळे, हरिन्दरकुमार भारती, पंकज उंबरकर,विशाल गेडाम व गजानन कुडमेथे यांनी केली.