• B.E.O स्नेहदीप काटकर यांनी दिले धडे.
अजय कंडेवार,वणी :- शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरही विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणाऱ्या शिक्षकाना प्रशिक्षणाची गरज असते. त्यातूनच स्थानिक मार्कंडेय पोद्दार लर्न स्कूलमध्ये मागील काही दिवसांपासून इयत्ता पहिली ते पाचवीला शिकविणाऱ्या सर्व माध्यमांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण झाले. गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर यांच्या नेतृत्वाखाली हे प्रशिक्षण २६ ते ३० डिसेंबर या दरम्यान तिसऱ्या टप्यात पार पडले.
जागतिक स्वीकार्याला असलेली मुले घडवायची असतील तर मुलांमध्ये असलेले सुप्तगुण व कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे. हा उद्देश ठेवून हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विस्तार अधिकारी प्रकाश नगराळे हे होते. तसेच तालुका समन्वयक म्हणून विनोदनासरे तसेच प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख कोवे, खुसपुरे, काटकर हे होते. सुलभकम्हणून अनुराधा केळकर, लोकेश बागडे, गजानन गुल्हाने, हंसराज काटकर, विजय चव्हाण, ज्योती ढाले, दत्तात्रय पुलेनवार व विनोद अवधरे यांनी कार्य पार पाडले.
तालुकास्तरावर समन्वयक महाद्वीय परीक्षा समन्वयक म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याचे मु.का.अ. यांच्याकडून विनोद नासरे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रशिक्षणात उत्तमरीत्या सोय देखील करण्यात आली. प्रशिक्षणाचे तीन टप्पे यशस्वीरीत्या पार पाडले