Tuesday, July 15, 2025
Homeवणी"प्रहार जनशक्ती पक्ष " निवडणूकीच्या रिंगणात उतरणार-नितीन गोरे (वणी तालुका अध्यक्ष)

“प्रहार जनशक्ती पक्ष ” निवडणूकीच्या रिंगणात उतरणार-नितीन गोरे (वणी तालुका अध्यक्ष)

अजय कंडेवार,वणी :- प्रहार जनशक्ती पक्ष वणी तालुक्यातील येत्या जिल्हा परिषद , पंचायत समिती, आणि वणी नगरपरिषद,निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे वणी तालुका अध्यक्ष नितीन गोरे यांनी सांगितले.






सर्व पक्ष कामाला लागले आहेत,काही पक्षांना निवडणूक तोंडावर आल्यावरचं सर्व सामान्याचे काम आठवते परंतु प्रहार जनशक्ती पक्ष हा सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, वंचित, विधवा, निराधार,दिव्यांग बांधवांचा पक्ष आहे. आजपर्यंत जे सर्वसामान्यांसाठी काम करत आला आहे. ते यापुढे करतं राहणार आहे हा विश्वास जनतेच्या मनात आहे.


सर्वसामान्य जनतेतून चर्चेला उधाण येतं आहे की प्रहार जनशक्ती पक्षांने लोकहीतासाठी निवडणुका वणी तालुक्यात ‌लढवाव्यात यापुढे लवकरच प्रहार जनशक्ती पक्षाचे आदरणीय पक्ष प्रमुख आमदार बच्चु भाऊ कडू, प्रदेश अध्यक्ष अनिल भाऊ गावंडे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष बल्लु भाऊ जवंजाळ, यवतमाळ जिल्हाध्यक्ष बिपिन भाऊ चौधरी, यांच्या मार्गदर्शनाखाली वणी तालुक्यातील येत्या निवडणुकीतील जिल्हा परिषद,व पंचायत समितीच्या लढवणार तालुक्यात कोण उमेदवार असतील व कोणत्या जागेवरून लढणार याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ असेही वणी तालुका अध्यक्ष नितीन गोरे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments