•सत्ताधारी पदाधिकारी “चमकोगिरीत” मोठे “वैभव”
•”चायपेक्षा” केटली”गरम “अशी यांची स्थिती.
अजय कंडेवार, वणी:-हल्ली ज्याला त्याला पुढारपणाचे वेड लागले आहे. शुभ्रवस्त्र परिधान केले की, काही तरुणांना नेतेगिरीचा ‘फिल’ येतो. त्यातूनच आरटीआय अर्जासह तक्रारी करण्याचा उद्योग सुरू केला जातो. प्रशासनातील अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार घडतात. सध्या वणी मतदारसंघात सत्ताधारी पक्षात आंदोलनाच्या ‘स्टंट’ मध्ये चांगलाच “वैभव ” आल्याचे दिसून येत आहे.
श्रमजीवी समाजनिर्मितीत आमची व्यवस्था अपुरी पडली.त्यात राजकारणाचे वेड हल्ली तरुणाईला अधिकच लागले आहे. जहाल विचारधारेच्या व धार्मिक विचारसरणीच्या पक्षाकडे तरूणाईचा कल वाढतो आहे. प्रामुख्याने लोकशाहीत कुठेही धर्म, जाती, पंथ, भेदाला थारानाही.भारताचे नागरिक म्हणून सर्वजाती धर्माचे लोक आहेत. मात्र, तरूणाईमध्ये जहाल सरणी निर्माण करून राजकारणी मंडळी आपली पोळी शेकून घेत आहे.
त्यामध्ये लोकांच्या विकासाचे प्रश्न तसेच मागे पडत आहे. मुळात किशोरवयीन अवस्थेत मुलांनी शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज असते. तारूण्यात रोजगाराच्या संधी शोधून करिअर करायचे असते. मात्र, तरूणाई कोणत्या तरी पक्षाचे झेंडे खांद्यावर घेऊन जिंदाबाद – मुर्दाबाद घोषणा देण्यात आयुष्याचा महत्वाचा काळ गमवतात. त्यातूनच सध्या वणी मतदारसंघात काही तरूणानी राजकीय पक्षाचे झेंडे खांद्यावर घेऊन आंदोलनाची वारंवार भूमिका घेण्याचा प्रयोग चालविला आहे. लोकांच्या प्रश्नावर भांडणे लोकशाहीतील हक्क आहे. मात्र, प्रशासनाकडे तक्रारी करून स्वताचे उखळ पांढरे करायचे हा उद्योग अनेकांनी सुरू केला आहे. अनेक शासकीय विभागामध्ये माहिती अधिकाराचे अर्ज टाकून वेगळाच उद्योग केला जातो. सत्ताधारी पक्षाच्या एका तरुणाने आंदोलनाच्या ‘स्टंट’ बाजीचे चांगलाच “वैभव” अव्वलरित्या असून त्यातून किती लोकांचे प्रश्न सुटतात हा मात्र संशोधनाचा विषय आहे.