•सामाजिक व राजकीय कार्यात सतत अग्रेसर असणारा हाच “तो ”
अजय कंडेवार,वणी :- समाजात अनेक प्रकारचे लोक असतात. काही लोक केवळ बडबड करण्यात पटाईत असतात तर, काही लोक बोलण्यापेक्षा कृती करण्याला महत्व देतात. निर्झरासारखा खळखळाट करण्यापेक्षा शांतरित्या कामांनी चिंब करणारा एक दमदार , लहान वय , मृदू स्वभावाचा युवा जर कोणी असेल तर, तो.. अजिंक्य शेंडे . आणि या युवकाचा किंवा वणी साठी युवा नेते म्हणणेही काही चुकणार नाहीं अश्या युवा व्यक्तिमत्वाच आज अभिष्टचिंतन…..
“करे अल्पज्ञानी बहु बडबडाट। जसा निर्झराचा अति खळखळाट ॥असे पुर्णज्ञानी कमी बोलणारा। विना नाद वाहे जशी गंगाधारा ॥ “
आपल्यापासून दूर राहणारा, महागड्या मोबाइलवर बोलत आलिशान गाड्यांमधून फिरणारा नेता तरुणाईला नकोय. त्यांना “युवा नेता” हवाय तो त्यांच्यामध्येच उठ-बस करणारा, त्यांच्याशी संवाद साधणारा, त्यांच्या समस्या जाणून घेणारा. हाच सूर वणीत युवा अजिंक्य शेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणी शहरात घेण्यात आलेल्या ” मॅरेथॉन दौड” मध्ये शेकडो युवकांची उपस्थितीतून दिसून आले.
नव्या पिढीचे प्रश्न, विचार आणि आम्हाला हवे असणारे बदल हे कदाचित फार वेगळे आहेत. ज्याचा विचार करणारं नवं नेतृत्व तरुणवर्गाला आकर्षित करत आहे. शहरातील प्रश्न आणि समस्या या आता वेगळ्या आहेत आणि त्यावर आजही योग्य ते निर्णय घेताना फार उशीर होतो. परंतु हाच एकमेव “अजिंक्य शेंडे” अनेक समस्यांचा योग्य तो तोडगा शोधतांना सर्व युवकांना तसेच जनतेला दिसत आहे. वणीत अनेकांवरून विश्वास आता उडाला आहे आणि आता तरुण नेतृत्वासोबत अनेक नवीन बदल घडून येतील यातही आता काहीं शंका नाहीच.