•चिमुकल्यांचा सुप्त कला ,गुणांना वाव मिळावा याकरिता आयोजनही.
अजय कंडेवार,वणी :- अन् ‘राम जन्मला गं सखी, राम जन्मला’, ‘सियावर रामचंद्र की जय… पवनसुत हनुमान की जय… प्रभू रामचंद्र भगवान की जय’… अशा जयघोषाने वणी येथील श्रीरामनगरी परिसर दुमदुमदून गेला. कीर्तन, भजन आणि श्रीरामाच्या नामस्मरणाने श्रीराम नगरीतले वातावरण भारावले आणि शहराच्या विविध भागांतील मंदिरांमध्ये रामजन्म उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील प्रमुख मंदिरांमध्येही दिवसभर भाविकांची वर्दळ सुरू होती.Prabhu Ramchandra Bhagwan Ki Jai ‘…! With this shout, Sriram Nagari rumbled.
An Organized to give scope to the latent art and qualities of the little ones.
अशीच.. प्रभू श्रीराम नवमी वणी येथील श्रीरामनगरीत अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. त्यामध्ये चिमुकल्यांचा सुप्त कला ,गुणांना वाव मिळावा याकरिता गायन,नृत्य, भजन स्पर्धा आयोजित करण्यात आले तसेच कार्यक्रमाची सुरुवात विधिवत पूजन आणि संगीत भजनाने सुरवात करण्यात आली.यास्पर्धेत खुशी मोहितकर,अनवी जूनुंनकर,पावणी चौधरी,साजिरी झाडे,अमृता ताजने,माही जुनुनकर सुमेधा गाडगे,रूद्र बोबडे, आरव राऊत, गुडिया सुरपाम, टुकटुक महोतो,तनुश्री चंदेल, अश्र्विर चांदणे व इतर सर्व गायन स्पर्धा,सुष्मा बोबडे, पूजा राऊत, सविता मेश्राम यांनी सहभाग घेतला.यातील समस्त भाग घेणाऱ्या स्पर्धकांना प्रोत्साहनपर पारितोषिक बक्षिसही वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला श्रीराम उत्सव समिती श्रीराम नगर, वणी चे अध्यक्ष शरद तराळे, उपाध्यक्ष मंथना सूरपाम, उपाध्यक्ष वैभव राऊत,सचिव भूपेंद्र देरकर, सहसचिव रवींद्र चांदणे, कोषाध्यक्ष अदवेश प्रसाद, सल्लागार, ॲड.दिपक खोके, प्रमोद जूनुंनकर, अनील उत्तरवार ,वसंतराव डाखरे, आत्मराम ताजने ,अजय धोबे, दूमने,संचालक प्रवीण झाडे, धनजय गाडगे,अनील खरवडे, बळीराम बोबडे, संजय पांचोले, उमेश चौधरी, दुर्गेशवर उरकुडे,कैलाश मेश्राम, मधुकर आत्राम ,अशोक पांडे,सोनटक्के,मोहितकर, भास्कर मोरे,बन्सीलाल चांदेकर,अभय राजुरलावार, झुंगरे ,सुरपाम, हरि चंदेल, बदखल,अजय महोतो, प्रकाश डाहुले इतर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माया शरद तराळे, प्रास्ताविक रविंद्र चांदणे यानी तर आभार प्रदर्शन झुंगरेताई यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम नगर येथील रहिवासी ,श्रीराम समिती उत्सव समिती ,सर्व सभासद पदाधिकारी तसेच महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता स्वरूची भोजनाने करण्यात आली.