Saturday, August 29, 2026
HomeBreaking Newsप्रभाग 8 मध्ये भाजपचा ‘गेम होणार’ ?

प्रभाग 8 मध्ये भाजपचा ‘गेम होणार’ ?

Ajay Kandewar,Wani:- वणी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 8-ब मध्ये रंगतदार लढत पाहायला मिळत आहे. या प्रभागात एकापेक्षा एक रग्गड आणि अनुभवी उमेदवार रिंगणात उतरल्याने स्थानिकांमध्ये निवडणुकीचा थरार चांगलाच वाढला आहे.

प्रभागातून राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे प्रशांत विठ्ठलराव कापसे, शिवसेना (उबाठा) चे सुधीर रिमदेव थेरे, अपक्ष (टीव्ही चिन्ह) चे सागर मारोती पोडचलवार, शिवसेना (शिंदे) चे राजू नागोराव रिंगोले, अपक्ष (सिलिंग फॅन चिन्ह) शेख अब्दुल रज्जाक, भाजपचे कुणाल संजय सोमशेट्टीवार आणि एमआयएमचे हुसैन आसिम हुसैन मंजूर (पतंग) हे उमेदवार रिंगणात आहेत.स्थानिक राजकारणात चर्चा रंगली असून मतदारांचा सूर एका मुद्द्यावर ठाम दिसतो,

“प्रभाग 8 मध्ये भाजपाचा Game होऊ शकतो.कारण, या प्रभागातील बहुतेक उमेदवार जनतेत ओळख असलेले, रग्गड आणि तडफदार आहेत. विशेष म्हणजे भाजपा उमेदवाराविरोधात नाराजीचा सूर उमटत असल्याची चर्चा जोरात आहे. त्यामुळे भाजपाचा धुरळा करण्यासाठी काही उमेदवार खास उतरल्याचेही कानोकानी बोलले जात आहे.यामुळे नवख्या आणि पर्यायी उमेदवारांना मतदार संधी देतील, अशी चर्चा इथल्या गल्लीबोळात जोर धरत आहे.त्यामुळे प्रभाग 8 मध्ये कोणाचा पलडा भारी ठरणार आणि कोण ‘गेम’ करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page