•2 बैल जागीच ठार, एक जखमी
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील शिरपूर येथे तुटलेल्या जिवंत तारेचा स्पर्शाने 2 बैलांना जीव गमवावा लागल्याची घटना असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमध्ये दोन बैल जागीच मृत्यू व एक बैल जखमी झाल्याची माहिती मिळाली.
27 नोव्हें.रोजी सकाळी 11 वाजता सालगडी बैल शेताकडे नेत असतांना शिरपूर गावापासून अवघ्या 150 मिटर अंतरावर विद्युत तार तूटलेल्या अवस्थेत नवेगावाला जाणाऱ्या रस्त्यावर असल्याने या तारांचा स्पर्श दोन बैल ठार झाले तर एक बैल गंभीररित्या जखमी झाल्याने उमेश बोंडे यांच्यावर आर्थीक संकट कोसळले आहे. जवळपास 2 ते 3 लाखांचे नुकसान झाले आहे. यात बोंडे परिवार अतिशय खचला आहे कारण ऐन कार्तिक पौर्णिमा सणासुदीचा दिवशी ही घटना फार दुःखद घडली.
या घटनेची माहिती गावातीलच सुवर्णा बोंडे पोलिस पाटीलांनी विद्युत महावितरणला या भागातील विद्युत वाहिन्या तुटून असल्याची माहिती वेळोवेळी दिली होती. त्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच हा प्रकार घडला असून हे नशिबाने मानवी जीव बचावले आहेत; अन्यथा मोठा अनर्थ घडला असता, अशी संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केली. शेतीच्या हंगामात बैल दगावल्याने बोंडे परिवार हे हतबल झाले आहेत. महावितरणच्या गलथान कारभारामुळे हा प्रसंग ओढवला असून भरपाई मिळावी, अशी मागणी संबंधित त्यांनी केली आहे.